Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.
हेही वाचा - Konkan Railway: ऐन हंगामात विशेष गाडीच्या फेर्यांमध्ये कपात; प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.

Facebook Comments Box


