Mopa Airport Newa: दक्षिण गोव्याच्या पेडणे येथील मोपा गावातील ‘मोपा’ या विमानतळाचे लोकार्पण उद्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात हा विमानतळ पाच जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहेत. ह्या प्रकल्पामुळे गोव्याच्या विकासात खूप मोलाची भर पडेल. आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मोपा विमानतळाचा देशात दुसरा क्रमांक लागणार आहे. जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र गोव्यात आहे. सुरवातीच्या काळात 40 ते 50 लाख ह्या प्रवासी ह्या विमानतळावरून प्रवास करणार असा अंदाज मांडला आहे. तर पुढील काही वर्षात ही संख्या 1 ते दीड कोटी होणार आहे असाही अंदाज आहे. साहजिकच पुढील 5 ते 10 वर्षात गोव्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.हे विमानतळ जिल्ह्यातून अगदी जवळ असलेल्या मोपा गावात होत असल्याने, हे विमानतळ गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असे दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ हे तालुके फक्त 15 ते 50 मिनिटाच्या अंतरावर आहेत.
प्रवासी वाहतुकीचा एक उत्तम पर्याय.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे डोमेस्टिक विमानतळ आहे त्यामळे तेथील उड्डाणाला मर्यादा आहेत. दिवसातून एक किंवा दोन उड्डाणे होत आहेत. मोपा विमानतळ हे आंतराष्ट्रीय विमानतळ असल्याने थेथे जगातील मुख्य देशासोबत आणि देशातील मुख्य शहरांसोबत वाहतूक होणार आहे. तसेच हे विमानतळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याला चिपी ह्या विमानतळापेक्षा जवळ आहे. मुंबई गोवा या महामार्गामुळे गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. वाहतुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून तळकोकणाला ह्या विमानतळाच्या माध्यमातून भेटेल.
पर्यटन आणि रोजगार
ह्या विमानतळावर आलेले काही टक्के पर्यटक जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळविण्यात आपण यशस्वी झालो तरी त्यातून खूप चांगल्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणुन घोषित केला आहे. पण दुर्दैवाने ह्या दर्जाच्या सुविधा अजून जिल्ह्यात उपलब्ध केलेल्या नाही आहेत. ही एक संधी आहे जिचा लाभ घेऊन जिल्ह्याचा विकास करता येईल.
उद्योजक आणि शेतकर्यांना संधी
गोव्याचा विकास झाला, तेथील पर्यटन वाढले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी खूप मोठी बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना मिळेल. अंतर कमी असल्याने शेतमाल गोव्याला पाठवून त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. गोव्यात जागेची समस्या असल्याने तेथे शेती मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेती उपदनासाठी ते लगतच्या दोडामार्ग आणि बांदा ह्या ठिकाणावर अवलंबून राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोपा विमानतळातून मालाची निर्यात पण शक्य होणार आहे. त्याचा फायदा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना खासकरून आंबा बागायतदारांना होऊ शकतो.
पण काही नकारात्मक बाजू पण आहेत. गोव्यात जागा कमी आहे, त्यामुळे तेथिल गुतंवणूकदार सिंधुदुर्गातील सीमेलगतच्या भागात वळेल आणि तेथील जमिनी खरेदी करेल. स्थानिक कोंकणवासियांनी आमिषाला बळी पडता आपले उद्योगे किंवा शेती द्वारे आपल्या जमिनीचा आपल्या प्रगतीचा उपयोग केला पाहिजे.
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यक्यता
ह्या संधीचे सोने करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. ह्या आधी सिंधुदुर्गचा विकासात राजकिय समीकरणे मध्ये येत होती. आता ती समीकरणे बदललेली आहेत. जिल्ह्यात २ कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहे. विशेष म्हणजे हि मंत्रीपदे राज्यात एकत्र आलेल्या पक्षाची आहेत त्यामुळे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास करण्यास एक अनुकूल समीकरण तयार झाले आहे. सर्व गोष्टी जर पूर्वनियोजित पद्धीतीने केल्यात तर येणाऱ्या काही वर्षात त्याचा परिमाण दिसण्यास सुरवात होईल हे नक्की.
Facebook Comments Box
Vision Abroad