मुंबई :वर्षअखेर आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोवा आणि कोकणात जाणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC वतीने मुंबई ते पणजी दरम्यान शिवशाही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. ह्या सेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही सेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणारी ही बस सेवा कायमस्वरूपी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
(हेही वाचा >कोकणातील भाविकांना खुशखबर…शेगावला जाण्यासाठी रेल्वेचा नवा पर्याय…)
भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ह्या गाडीच्या फेऱ्यांमध्ये पण वाढ केली जाईल असे महामंडळाने म्हंटले आहे. महामंडळाच्या ह्या निर्णयाचे कोकण वासियां कडून स्वागत करण्यात आले आहे. भविष्यात कदंबा व्हॉल्वो बस प्रमाणे शिवशाहीची व्हॉल्वो बस ह्या मार्गावर चालविण्यात यावी अशी मागणी पण होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण, विरार तसेच ईतर उपनगरीय स्थानकावरून अशा बस सोडण्यात याव्यात अशीही मागणी होत आहे.
खाजगी बस मालकांच्या लूटमारीवर अंकुश लागणार.
कोकणमार्गे जाणार्या खाजगी बस मालकांकडून हंगामात अतिरिक्त प्रवासभाडे वसूल करण्यात आल्याचा अनेक तक्रारी येत असतात. शिवशाही बससेवेमुळे त्यावर आता चांगल्या प्रमाणात अंकुश लावता येणार आहे. पण त्यासाठी हंगामात शिवशाही बसेस च्या जास्त फेर्या चालवल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात शिवशाही बस च्या फेर्या वाढल्या तर ही लूटमार पूर्णपणे बंद होईल अशी प्रवाशांना आशा आहे.
मुंबई – पणजी शिवशाही बसचे आपल्या स्थानकापर्यंतचे भाडे आणि अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून त्यासंबधीत बातमी वाचा..
उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे
प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई सेंट्रल – पणजी हि वातानुकूलित शिवशाही बस सेवा कायम स्वरुपी चालू ठेवण्यात आली आहे! pic.twitter.com/iV5pES2R3G
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) January 3, 2023