सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक राजवाड्यात ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत दशावतार लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. लोककलांना राजाश्रय देणाऱ्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच श्रीमंत शिवरामराजे यांचा युवराज लखमराजे सावंत-भोंसले पुढे नेत असून युवराजांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
(Also Read>खाजगी बस मालकांच्या लुटमारीवर अंकुश लागणार..मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस नियमित धावणार…)
या महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत,त्याची माहिती पुढीलप्रमाणे
दिनांक | वेळ | नाटक कंपनी | नाटकाचे नाव |
---|---|---|---|
गुरुवार ५ | ६.३० ते ८ | चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण | गौरी स्वयंवर |
८.३० ते १० | वालावलकर दशावतार नाट्यमंडळ,ओसरगाव | वेध राहुचे ग्रहण चंद्र सूर्याची | |
शुक्रवार ६ | ६.३० ते ८ | कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर | कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य |
८.३० ते १० | खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) | पालीचा बल्लाळेश्वर | |
शनिवार ७ | ६.३० ते ८ | दत माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग | शेषात्मज गणेश |
८.३० ते १० | महापुरुष दशावतार नाट्यमंडळ | प्रलंयकारी गणेश | |
रविवार ८ | ६.३० ते ८ | नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड | बहुवर्मा पुत्रप्राप्ती |
त्यानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे. कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या पारंपरिक दशावतार कलेचे जतन व्हावे ही कला वृद्धींगतद्धीं व्हाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा, या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत-भोंसभों ले यांच्या संकल्पनेतून या दशावतार लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कलाप्रेमींनी मीं उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. भारमल यांनी केले
(Also Read>पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)
Vision Abroad