आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात भीषण अपघात..

रत्नागिरी :खेड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.

आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.

यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.

हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

(हेही वाचा>मोपा विमानतळावरून पहिले विमान उडाले…मुंबई ते गोवा प्रवासभाडे रेल्वेच्या एसी फर्स्टक्लास (1A) पेक्षाही कमी)

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search