संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai to Konkan RORO Service: अवघ्या ५ तासांत मुंबईतून तळकोकणात! वाहतुकीचा जलद पर्याय लवकरच खुला हो...
कोकण
Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्र...
स्थानिक बातम्या
....अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा 'रेल रोको'...प्रवासी संघटनेचा इशारा
कोकण रेल्वे


