Navi Delhi:केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिकिंग करणे अनिवार्य केले आहे त्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख दिली होती. या तारखेनंतर ज्या नागरिकांचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसतील त्यांची पॅनकार्ड रद्द होतील. त्याचा काहीच उपयोग करता येणार नाही. त्यामुळे असे नागरिक बँकिंग, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बीएसई, एनएसई व्यवहार करता येणार नाहीत. एकूण अशा नागरिकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांना थेट निर्बंध येतील असे जाहीर करण्यात आले होते.
हेही वाचा – मुंबई ते गोवा रेल्वेने प्रवास करताय? कोकण रेल्वे मार्गाव्यतिरिक्त रेल्वेचा ‘हा’ पर्याय सुद्धा जाणून घ्या…
पण आज आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन ही मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नसेल त्यांना तसे करण्यास अवधी भेटला आहे. या तारखेनंतर ज्या नागरिकांचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक नसतील त्यांची पॅनकार्ड रद्द होतील. पण असे नागरिक ३० दिवसांच्या अवधीत कार्ड लिंक करू शकतील पण त्यासाठी विशेष दंड वसूल करण्यात येणार आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box
Vision Abroad