Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
सिंधुनगरीत बीएसएनएलच्या टॉवरला भीषण आग; टॉवरवरील केबल व स्क्रॅप मटेरियल जळून खाक... - Kokanai

सिंधुनगरीत बीएसएनएलच्या टॉवरला भीषण आग; टॉवरवरील केबल व स्क्रॅप मटेरियल जळून खाक…

सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले. 

टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग. 

प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती. 

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

1 thoughts on “सिंधुनगरीत बीएसएनएलच्या टॉवरला भीषण आग; टॉवरवरील केबल व स्क्रॅप मटेरियल जळून खाक…

  1. अशोक तेली says:

    Private कंपनी साठी रान मोकळे झाले… आता नेटवर्क चा घोळ सुरू होणार
    म्ह्णून या सरकारी कंपनी pvt करून टाका तरच सुधारतील सरकारी बाबू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search