कोकणात बिहारराज; कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला.यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोकण रेल्‍वे मार्गावरील कोलाड स्‍थानकाजवळ गेटमनची गोळया झाडून हत्‍या करण्‍यात आली. चंद्रकांत कांबळे असे असे हत्या झालेल्या गेटमनटे नाव आहे. मृत मोटरमन हा तेथून जवळच असलेल्‍या महाबळे गावचा रहिवासी आहे. गोळीबाराच्‍या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्‍लेखोर आणि हत्‍येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या हत्येचे वृत्त समजताच पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला. या घटनेनंतर महाबळे ग्रामस्‍थ घटनास्‍थळी पोहोचले. भर दिवसा हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही अशी भूमिका त्‍यांनी घेतली होती. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search