कुडाळ :भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच “मेरी माती मेरा देश” या संकल्पनेअंतर्गत यंदा कुडाळ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या उत्सवास सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, देवदत्त नागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बॉलीवूड गायक सचिन गुप्ता यांचा लाईव्ह शो या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत २६ पथकांनी नोंदणी केली असून त्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथील पथकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळाला ५,५५,५५५ या रकमेचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे कुडाळ भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले आहे.
ज्या मंडळांना या उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाव नोंदणी साठी रुपेश कानडे यांच्याशी 7020363896 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'अनारक्षित विशेष' गाड्या
कोकण
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एसटी सेवेबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नितेश राणे यांची परिवहन मंत्र्यासोब...
सिंधुदुर्ग
यंदा आंबोलीत वर्षा पर्यटनास जाण्याचा बेत असेल तर ही बातमी वाचाच; 'या' गोष्टी केल्यास होईल कारवाई
कोकण