Causes mango to rot : हापूस आंब्याची आवक वाढल्याने आता दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सहाजिकच मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी होताना दिसत आहे. मात्र त्याच बरोबर आंबा खराब निघण्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत.
ग्राहक बोलताना एक तक्रार सांगतात ती अशी – मागच्या वर्षी आम्ही अमुक कडून 5 डझन ची हिरव्या आंब्यांची पेटी घेतली होती,आम्ही 6-7 दिवसांनी जेव्हा आंबा पिकल्याचा वास यायला लागला तेव्हा पेटी उघडून बघितली तर बरेचसे आंबे देठा कडून नसलेलं होते, काळे पडले होते इत्यादी इत्यादी, हे सांगताना कुठेतरी त्यांच्या मनात असते कि त्या आंबा विक्रेत्यांनी फसवले आहे.परंतु या मध्ये कस्टमर चें अज्ञान आणि आंबे विक्रेत्यांनी न दिलेल्या सूचनामुळे आंबा वाया जातो. आंबा खराब निघाला की विक्रेत्याने फसवणूक केली आहे असा सूर निघतो. पण कित्येकदा विक्रेत्याची चूक नसते, तो चांगलाच आंबा देतो मात्र आपल्या चुकीमुळे आपणच तो खराब करतो. थोडीशी काळजी घेतली तर आंबा खराब होणार नाही.
आंबा खरेदी करून घरी आणल्यानंतर आंब्याचा बॉक्स लगेच उघडून हवेशीर आणि सावलीच्या जागेत ठेवा. शक्य झाल्यास घरात आंब्याची अढी लावा जेणेकरून आंबा तुमच्या डोळ्यादेखत राहिल आणि आंबा जास्त पिकून सडणार नाही किंवा देठा पाशी काळा पडणार नाही.
बर्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि आंबा पिकण्यासाठी उष्णता लागते, म्हणून पेटी 5-6 दिवस उघडली जातं नाही आणि मग आंब्याचा कोळसा होऊन जातो. आंबा पिकण्यासाठी 30-35डिग्री तापमान पुरेसे असते..तसेच खेळती हवा याची आवश्यकता असते. पेटीतून खूप दिवस ना काढल्याने पेटीचता आतील तापमान वाढून आंबा हिरव्याचा पिवळा ना होता किंवा किंचित पिवळा होऊन तो काळा पडायला लागतो म्हणजेच नासतो, आणि आपल्या मराठी म्हणी प्रमाणे एक सडका नासका आंबा आजूबाजूच्या आंब्यांना नसवतो. त्यामुळे जेव्हा आंबा आणाल तेव्हा पेटी किंवा बॉक्स उघडून आंब्याची अढी टेबल किंवा बेड किंवा कुठेही अश्या ठिकाणी लावा ( खाली न्यूज पेपर पसरून )म्हणजे तुमचा आंबा नसणार नाही आणि नुकसान टळेल.
Vision Abroad