



सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.
ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.
ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
ही नवी गाडी रत्नागिरीतील खेड, संगमेश्वर, आडवली आणि राजापूर या स्थानकांवर थांबायला हवी… अन्यथा ही गाडी केवळ सिंधुदुर्ग आणि गोवावासीयांसाठी सुरु केली असल्याचे स्पष्ट होईल… रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणी जनतेला या गाडीचा काहीच फायदा नाही… त्यामुळे कोकण रेल्वेने नव्या थांब्यांसह वेळापत्रक बदलावे !!
बाकी सगळे काही सांगताय पण दोन्ही कडून सुटण्याची वेळ मात्र सांगत नाहीत