राज्यातील तमाम जनतेला अभिमान वाटावा अशी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वार अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या – कुलगुरू प्रा. शांति श्री घुलीपूडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रैटिजिक स्टडीज वा नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजि, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्रापट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षात सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
“आम्हाला भारतीय ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता आणि भारताच्या सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयुमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी खूप उत्साह दाखवला आणि आम्हाला १० कोटी रुपयेही दिले. भारत बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणे देखील महत्त्वाचे आहे. असं जेएनयूच्या प्राचार्या शातिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितलं.
Facebook Comments Box