२९ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
🔆तिथि-द्वादशी – 10:34:11 पर्यंत
🔆नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 18:34:11 पर्यंत
🔆करण-तैतुल – 10:34:11 पर्यंत, गर – 23:56:22 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-इंद्रा – 07:46:33 पर्यंत
🔆वार-मंगळवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:05
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-28:41:59
🔆चंद्रास्त-16:15:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
🔆१८५१: ब्रिटीश कालीन भारतात बंगाल प्रांतात ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
🔆१८६४: युनान देशाने नवीन संविधान अंगिकारले.
🔆१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना
🔆१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
🔆१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान
🔆१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
🔆१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
🔆१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर
🔆१९९६: स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
🔆१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड
🔆१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
🔆१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर
🔆१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
🔆२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
🔆२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
🔆२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३९: ब्रिटीश कालीन भारतातील ओडिसा राज्यातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ता जय राजागुरू यांचा जन्मदिन.
🔆१८९७: जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (मृत्यू: १ मे १९४५)
🔆१९३१: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (मृत्यू: ७ मार्च २०००)
🔆१९३७: “कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार“ प्राप्त भारतीय कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक, पत्रकार, चरित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी एस. आर. रामास्वामी यांचा जन्मदिन.
🔆१९३९: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली कवी, नाटककार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि कादंबरीकार मलय रॉय चौधरी यांचा जन्मदिन.
🔆१९७१: मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
🔆१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
🔆१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
🔆१९८७: भारतीय व्यावसायिक बॉक्सर (मुष्टियोद्धा) विजेंदर सिंह बेनिवाल यांचा जन्मदिन.
🔆१९८९: भारतीय विद्यमान क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज वरून आरोन यांचा जन्मदिन.
🔆१९९६: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हेपॅथलिट स्वप्ना बर्मन यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१९११: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)
🔆१९३३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
🔆१९७८: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)
🔆१९८१: दादा साळवी – अभिनेते (जन्म: ? ? ????)
🔆१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ३ एप्रिल १९०३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box
Call on 9028602916 For More Details 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search