१६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-प्रथम – 23:52:27 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 19:28:37 पर्यंत
  • करण-बालव – 13:24:01 पर्यंत, कौलव – 23:52:27 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-परिघ – 23:46:48 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय- 06:49
  • सूर्यास्त- 17:58
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 18:18:59
  • चंद्रास्त- 07:00:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Day for Tolerance
महत्त्वाच्या घटना:
  • १८२१: कनाडा या देशात नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.
  • १८२१: मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
  • १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
  • १८७०: ओकलाहोमा आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.
  • १८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन
  • १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
  • १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह’ सुरू झाली.
  • १९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
  • १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
  • १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
  • १९६५: वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
  • १९७५: पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
  • १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
  • १९९५: भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.
  • १९९६: ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड
  • १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
  • १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधी ल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
  • २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर
  • २००६: पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
  • २००७: भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.
  • २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्‍न’ हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
  • २०१४: इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)
  • १८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १८९१)
  • १८४६: उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा जन्म झाला होता.
  • १८८०: ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा जन्म झाला होता.
  • १८९४: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)
  • १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
  • १९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)
  • १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)
  • १९१७: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)
  • १९२०: अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा जन्म झाला होता.
  • १९२२: पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा जन्म झाला होता.
  • १९२२: विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा जन्म झाला होता.
  • १९२७: डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’ क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
  • १९२८: डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)
  • १९३०: मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (मृत्यू: ११ जून १९९७)
  • १९३१: भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा जन्म झाला होता.
  • १९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
  • १९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)
  • १९७३: पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा मृत्यू झाला होता.
  • १९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. (जन्म: ? ? १८८८ – तळेगाव ढमढेरे, पुणे)
  • १९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)
  • १९५०: डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे एक संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
  • १९६०: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (१ फेब्रुवारी १९०१)
  • १९६७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (जन्म: १४ जुलै १९१७)
  • २००६: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १९१२)
  • २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search