आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 29:05:45 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 11:25:39 पर्यंत
- करण-गर – 17:48:30 पर्यंत, वणिज – 29:05:45 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-ब्रह्म – 09:09:12 पर्यंत, इंद्रा – 30:44:14 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:18
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 16:45:00
- चंद्रास्त- 30:42:59
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय युवा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
- १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
- १७०८: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक केल्या गेल्या.
- १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
- १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
- १९३१: प्रसिद्ध पाकिस्तानी कवी अहमद फ़राज़ यांचा जन्म.
- १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
- १९३६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जन्म.
- १९४९: माजी संसद चे सदस्य पारसनाथ यादव यांचा जन्म.
- १९६४: राजनीतिज्ञ अजय माकन यांचा जन्म.
- १९६४: उत्तर प्रदेश चे माजी उपमुख्यमंत्री तसेच राजनीतिज्ञ दिनेश शर्मा यांचा जन्म.
- १९७२: कॉंग्रेस च्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा जन्म.
- १९८४: स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
- १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
- २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
- २००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
- २००७: “रंग दे बसंती” या चित्रपटाला ब्रिटिश अॅकेडमी फिल्म पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
- २००९: जगप्रसिद्ध ए. आर. रेहमान हे गोल्डन ग्लोब अवार्ड मिळणारे पहिले भारतीय ठरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १५९८: राजमाता जिजाबाई (मृत्यू: १७ जून १६७४)
- १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
- १८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)
- १८६९: भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
- १८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
- १८९९: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)
- १९०२: महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (मृत्यू: १३ जुलै १९६९)
- १९०६: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
- १९१७: महर्षी महेश योगी (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
- १९१८: सी. रामचंद्र – संगीतकार (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८९७: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (जन्म: ४ जानेवारी १८१३)
- १९२४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांचे निधन.
- १९३४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सूर्य सेन यांचे निधन.
- १९४४: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)
- १९६६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: १० जानेवारी १८९६)
- १९७६: अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
- १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ (जन्म: ८ एप्रिल १९२४)
- १९९७: ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ’तलाश’, ’ फूल और पत्थर’, ’हलचल’, ’पापी, ’शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: ? ? १९२५)
- २००५: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad