आजचे पंचांग
- तिथि- षष्ठी – 20:02:33 पर्यंत
- नक्षत्र- आश्लेषा – 21:37:38 पर्यंत
- करण- कौलव – 08:03:58 पर्यंत, तैतुल – 20:02:33 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग- घ्रुव – 09:11:07 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:00:12
- सूर्यास्त- 19:12:17
- चन्द्र राशि- कर्क – 21:37:38 पर्यंत
- चंद्रोदय- 11:01:00
- चंद्रास्त- 24:11:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
- 1792 : केंटकी अमेरिकेचे 15 वे राज्य बनले.
- 1796 : टेनेसी हे अमेरिकेचे 16 वे राज्य बनले.
- 1831 : सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
- 1929 : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांनी कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली.
- 1930 : दख्खनची राणी डेक्कन क्वीन ट्रेन मुंबई-पुणे दरम्यान सुरू झाली.
- 1945 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली.
- 1959 : द. जा. कर्वे हे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
- 1961 : यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने जगातील पहिल्या स्टिरिओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी दिली.
- 1996 : भारताचे 11वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
- 2001 : नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
- 2003 : चीनमधील भव्य थ्री गॉर्जेस धरणात पाणीसाठा सुरू झाला.
- 2004 : रमेशचंद्र लाहोटी यांनी भारताचे 35 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1842 : ‘सत्येंद्रनाथ टागोर’ – पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू : 9 जानेवारी 1923)
- 1843 : ‘हेन्री फॉल्स’ – फिंगरप्रिंटिंग चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1930)
- 1872 : ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ ऊर्फ कवी बी – मराठी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1947)
- 1907 : ‘फ्रँक व्हाईट’ – जेट इंजिन विकसित करणारे यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑगस्ट 1996)
- 1926 : ‘मेरिलीन मन्रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1962)
- 1929 : ‘फातिमा रशिद’ ऊर्फ ‘नर्गिस दत्त’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 मे 1981)
- 1947 : ‘रॉन डेनिस’ – मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक यांचा जन्म.
- 1965 : ‘नायगेल शॉर्ट’ – इंग्लिश बुद्धिबळपटू यांचा जन्म.
- 1970 : ‘आर. माधवन’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
- 1985 : ‘दिनेश कार्तिक’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1830 : ‘स्वामीनारायण’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1781)
- 1868 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे 15 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1791)
- 1872 : ‘जेम्स गॉर्डन बेनेट’ – न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1795)
- 1934 : ‘श्रीपादकृष्ण कोल्हटकर’ – प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म : 29 जून 1871)
- 1944 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1867)
- 1960 : ‘पॉड हिटलर’ – जर्मन-ऑस्ट्रियन बहीण यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1896)
- 1962 : ‘अॅडॉल्फ आइकमॅन’ – दुसर्या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्या या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
- 1968 : ‘हेलन केलर’ – अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका यांचे निधन. (जन्म : 27 जून 1880)
- 1984 : ‘नाना पळशीकर’ – हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
- 1987 : ‘के.ए. अब्बास’ – दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 7 जून 1914)
- 1996 : ‘नीलमसंजीव रेड्डी’ – भारताचे 6वे राष्ट्रपती, लोकसभेचे 4 थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 19 मे 1913 – इलुरू, तामिळनाडू)
- 1998 : ‘गो. नी. दांडेकर’ – ज्येष्ठ साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1916)
- 1999 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल’ – होव्हर्क्राफ्ट चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 4 जून 1910)
- 2000 : ‘मधुकर महादेव टिल्लू’ – एकपात्री कलाकार यांचे निधन.
- 2001 : नेपाळचे राजे ‘वीरेन्द्र’ यांची हत्या. (जन्म : 28 डिसेंबर 1945)
- 2002 : ‘हॅन्सी क्रोनिए’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 25 सप्टेंबर 1969)
- 2006 : ‘माधव गडकरी’ – लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box