टोकियो, जपान:अंबरनाथचे सुपुत्र व टोकियो आमदार असलेले योगेंद्र पुराणिक (योगी) यांनी पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा टोकियो येथे उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.
मा. योगेंद्र पुराणिक यांचे बालपण अंबरनाथमधील कानसई परिसरात गेले असून, त्यांनी आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, अंबरनाथ येथून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये गेलेल्या योगी पुराणिक यांनी तिथे समाजकारणात सक्रिय भाग घेत जपानमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय आमदार म्हणून ऐतिहासिक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-जपान सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ होत आहे
या पवित्र स्मारकाला अंबरनाथचे माजी नगरधायक्ष श्री.सुनील चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. भेटीदरम्यान श्री सुनील चौधरी टोकियोतील मराठी व भारतीय समाजातील प्रतिनिधींशीही संवाद साधला.
Facebook Comments Box