Railway Updates: रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारी आणि चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Railway Updates । प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्हमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. निवडक कोच आणि लोकोमोटिव्हमध्ये यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील गैरप्रकार रोखण्यात येतील अशी आशा रेल्वेला आहे.

प्रत्येक कोचमध्ये चार डोम -प्रकारचे CCTV कॅमेरे असतील – प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ दोन कॅमेरे असतील. हे कॅमेरे प्रवाशांच्या कोणत्याही गोपनीयतेला अडथळा न आणता इतर जागा कव्हर करतील. लोकोमोटिव्हमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे असतील, जे पुढील, मागील आणि बाजूकडील दृश्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसवले जातील. रेल्वेत (Indian Railways) बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कव्हरेज संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ चोरीविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करेल. प्रवास करताना प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेमध्ये अनेकदा चोरीच्या मारामारीच्या घटना घडतात अशा घटनांना सुद्धा या नव्या सीसीटीव्ही सिस्टीम मुळे आळा बसेल. प्रवाशांना शिस्त लागेल.

 

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search