नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, यामुळे कोकणातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी व मालवाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केंदीय रेल्वे मंत्र्यानी दिली आहे.
रुळ अपग्रेड, बोगदे बंद, क्षमतेत वाढ
दुहेरीकरणाच्या या प्रस्तावांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील रुळांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या काही जुन्या बोगद्यांना बंद करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन बोगदे उभारण्याचा विचार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार असून, सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.
दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. सध्या एकेरी मार्गामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते, मात्र दुहेरी मार्गामुळे ही अडचण दूर होणार आहे.
प्रवासी आणि मालवाहतुकीला फायदा
या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे. विशेषतः कोकणातील आंबा, काजू, मासे तसेच औद्योगिक मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. परिणामी, कोकणातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Konkan Railway: कोकण रेल्वेचे दुहेरीकरण कधी? रेल्वे मंत्र्याकडून मोठी माहिती समोर – Kokanai https://t.co/3oKzMZOpXj#कोकणरेल्वे #दुहेरीकरण #रेल्वेविकास #कोकणविकास #प्रवासीसुविधा #KonkanRailway #RailwayDoubling #IndianRailways #InfrastructureDevelopment #PassengerFacilities pic.twitter.com/LQ6GyyuaVY
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) February 3, 2026


