पुढील ५ ते १० वर्षात महाराष्ट्रात ५,७०० किमीच्या २२ एक्स्प्रेसवेचे महाजाळे; जाणून घ्या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती

]block id=”google-news”]

मुंबई: महाराष्ट्र राज्य सध्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाचे ‘इंजिन’ म्हणून उदयास येत आहे. रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात एकूण ५,७५९.५ किलोमीटर लांबीच्या २२ एक्स्प्रेसवेचे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. ‘इन्फ्रा न्यूज इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील दळणवळण केवळ वेगवान होणार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.

समृद्धीनंतर आता ‘शक्तीपीठ’ आणि ‘उत्तर महाराष्ट्र’ एक्स्प्रेसवेचा बोलबाला
मुंबई-पुणे आणि समृद्धी महामार्गाच्या यशानंतर आता राज्य सरकारचे लक्ष मोठ्या प्रकल्पांकडे आहे.

शक्तीपीठ एक्स्प्रेसवे (८५६ किमी): नागपूर ते गोवा (पावनार ते पात्रादेवी) दरम्यानचा हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. याचा सुधारित डीपीआर (DPR) तयार असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्र एक्स्प्रेसवे (६४५ किमी): नाशिक-जळगाव-नागपूर हा मार्ग उत्तर महाराष्ट्राला थेट विदर्भाशी जोडेल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट

कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी बलवली-पात्रादेवी कोकण एक्स्प्रेसवे (३८९ किमी) हा गेमचेंजर ठरेल. याशिवाय, पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे आउटर रिंग रोड (१७३ किमी) चे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

हे एक्स्प्रेसवे केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाहीत, तर त्यांच्या बाजूने ‘इंडस्ट्रियल क्लस्टर्स’ विकसित केले जाणार आहेत. शेतमालाची वाहतूक जलद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास जिल्ह्यांना या महाजाळ्याचा मोठा फायदा होणार आहे.

या २२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांची जबाबदारी MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडे आहे. तर NHAI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) दिल्ली-मुंबई आणि पुणे-बेंगळुरू सारखे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सांभाळत आहे. नागपूर शहरासाठी NMRDA द्वारे आउटर रिंग रोडचे नियोजन पूर्ण झाले आहे.

येणाऱ्या ५ ते १० वर्षांत जेव्हा हे २२ मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होतील, तेव्हा महाराष्ट्र हे रस्ते कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि राज्याचे ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील द्रुतगती मार्गांची संपूर्ण यादी आणि सद्यस्थिती

अ.क्र. महामार्गाचे नाव लांबी (Km) लेन (Lanes)
सद्यस्थिती (Status)
1 मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 6
कार्यरत (Operational)
2 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 701 6
कार्यरत (Operational)
3 जालना-नांदेड एक्सप्रेसवे 179 6
बांधकाम सुरू (Under construction)
4 दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 170 8
बांधकाम सुरू (Under construction)
5 पुणे आउटर रिंग रोड 173 6
बांधकाम सुरू (Under construction)
6 नागपूर-गोवा (शक्तीपीठ) एक्सप्रेसवे 856 6
अंतिम मंजुरी प्रलंबित
7 बलावली-पत्रादेवी कोकण एक्सप्रेसवे 389 6
अंतिम मंजुरी प्रलंबित
8 पुणे-शिरूर-संभाजीनगर एक्सप्रेसवे 220 6
निविदा प्रक्रिया/DPR सुधारणा
9 पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 204 6
केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
10 विरार-अलिबाग मल्टि मॉडेल कॉरिडॉर 126 8
फेर-निविदा प्रक्रिया (Retendered)
11 नागपूर-भंडारा-गोंदिया एक्सप्रेसवे 141 4/6
कंत्राट लवकरच दिले जाईल
12 नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे 204 4
कंत्राट लवकरच दिले जाईल
13 भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे 116 4
कंत्राट लवकरच दिले जाईल
14 पुणे-नाशिक एक्सप्रेसवे 210 6
भूसंपादन अधिसूचना जारी
15 सुरत-नाशिक-चेन्नई कॉरिडॉर 400 6
फेर-निविदा प्रक्रिया (BOT मॉडेल)
16 पागोठे-चौक एक्सप्रेसवे 29 6
निविदा प्रक्रिया सुरू (Under bidding)
17 समृद्धी-वाढवण बंदर कनेक्टर 104 6
मंजूर (भूसंपादन लवकरच)
18 शेगाव कनेक्टर (समृद्धी महामार्ग) 109 4 मंजूर
19 नाशिक-जळगाव-नागपूर एक्सप्रेसवे 645 6 प्रस्तावित
20 जळगाव-नंदुरबार एक्सप्रेसवे 150 4 प्रस्तावित
21 कल्याण-लातूर एक्सप्रेसवे 445 6
DPR तयार करण्याचे काम सुरू
22 नागपूर आउटर रिंग रोड 148 6 मंजूर
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search