Ladki Bahin Yojna: e-KYC मध्ये चूक झाली असेल तर दुरुस्तीची अखेरची संधी

   Follow us on        

मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे काही पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून e-KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत ऑनलाइन पोर्टलवर दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपल्या नोंदी तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, हीच शासनाची प्रामाणिक भूमिका असून कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search