मुंबई: कोकणातील शिमगोत्सव (होळी) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी २०२६ मध्ये जादा वाहतुकीची विशेष योजना जाहीर केली आहे. मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातून मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्याने ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
या जादा वाहतुकीअंतर्गत मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर, ठाणे, बोरीवली, नालासोपारा आदी प्रमुख ठिकाणांहून कोकणातील खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, लांजा, कासे, सायन, देवगड, शिर्डी यांसह विविध गावी जाणाऱ्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
मुंबई सेंट्रल आगार (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)
मुंबई सेंट्रल ते कासे: रात्री ८:३० वाजता
मुंबई सेंट्रल ते खेड: रात्री ९:३० वाजता
मुंबई सेंट्रल ते गुहागर: रात्री १०:०० वाजता
मुंबई सेंट्रल ते दापोली: रात्री १०:४५ वाजता
परळ आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
परळ ते दापोली: सकाळी ६:०० वाजता
परळ ते देवरुख: संध्याकाळी ७:३० वाजता
परळ ते खेड: रात्री १०:०० वाजता
कुर्ला नेहरू नगर व सायन (२७ फेब्रुवारी २०२६ पासून)
कुर्ला ते गुहागर: रात्री ९:३० वाजता
कुर्ला ते खेड: रात्री १०:३० वाजता
सायन ते दापोली: संध्याकाळी ७:३० वाजता
ठाणे CBS आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
ठाणे ते महाड: सकाळी ८:०० आणि रात्री ११:३० वाजता
ठाणे ते खेड शिंदी: रात्री ९:०० वाजता (मार्गे: पनवेल, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर)
ठाणे ते साखरपा: रात्री ९:१५ वाजता
ठाणे ते गुहागर: रात्री ९:३० वाजता
ठाणे ते खेड: रात्री ९:४५ वाजता
ठाणे ते दापोली: रात्री ९:४५ वाजता
बोरीवली आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
बोरीवली ते खेड: सकाळी ८:३० वाजता
बोरीवली ते लांजा: संध्याकाळी ६:३० वाजता
बोरीवली ते दापोली: रात्री ९:३० वाजता (ठाणे मार्गे)
विठ्ठलवाडी आगार (२८ फेब्रुवारी २०२६ पासून)
विठ्ठलवाडी ते चिपळूण: सकाळी ५:४७ आणि रात्री ९:०१ वाजता
विठ्ठलवाडी ते महाड: सकाळी ६:३२ वाजता
विठ्ठलवाडी ते खेड: सकाळी ८:०० वाजता
विठ्ठलवाडी ते गुहागर: रात्री ८:३२ वाजता
विठ्ठलवाडी ते दापोली: रात्री ९:०२ आणि ९:१६ वाजता
मिळणाऱ्या विशेष सवलती:
१. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील सर्व प्रवाशांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा (अटी लागू).
२. महिला सन्मान योजना: सर्व महिला प्रवाशांना तिकीट दरात ५०% सवलत देण्यात येत आहे (अटी लागू).


