एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल अध्याय: सवलतधारकांसाठी आता ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, आता एस.टी. प्रवासात ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या नव्या डिजिटल युगाची घोषणा केली. या निर्णयानुसार, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी, स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकारांचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.

​हे स्मार्ट कार्ड प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर ठरणार असून, नवीन कार्डाची किंमत १९९ रुपये (GST सह) ठेवण्यात आली आहे, तर जुने कार्ड जमा करणाऱ्या प्रवाशांना ते १४९ रुपयांत उपलब्ध होईल. प्रवाशांना एटीएम मशीन, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटमार्फत हे कार्ड किमान १०० रुपये आणि त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत सहज रिचार्ज करता येईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली असून, बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे आता प्रवाशांना सुट्या पैशांच्या त्रासापासून मुक्ती मिळेल आणि एस.टी.चा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search