मुंबई, दि. २३ मार्च : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वेने मुंबई CSMT आणि मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे क्रमांक ०११२९ मुंबई CSMT–मडगाव विशेष गाडी ३ एप्रिल (शुक्रवार) आणि ५ एप्रिल (रविवार) रोजी मुंबई CSMT येथून रात्री १२:२० वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
तसेच, रेल्वे क्रमांक ०११३० मडगाव–मुंबई CSMT विशेष गाडी ३ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सायं. ४:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कर्णाली या स्थानकांवर थांबणार आहेत.
गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ५, स्लीपर – १०, जनरल – ४ आणि एसएलआर – २ डबे असतील.
या विशेष गाडीचे आरक्षण २४ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रे, इंटरनेट व IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
एप्रिल महिन्यात सुरवातीच्या आठवड्यात हनुमान जन्मोत्सव, गुड फ्रायडे आणि शनिवार – रविवार सुट्ट्या लागून आल्याने प्रवाशांची गर्दी होणे अपेक्षित असल्याने ही गर्दी कमी करण्याच्या हेतूने या गाड्या चालविण्यात येणार आहेत.


