पनवेल: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
०९०५७ सुरत–मंगळुरू जंक्शन विशेष (बुधवार, रविवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ दरम्यान धावणार आहे. तसेच ०९०५८ मंगळुरू जंक्शन–सुरत विशेष (गुरुवार, सोमवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते १ जून २०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे.
याशिवाय ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू जंक्शन विशेष (शुक्रवार) २७ मार्च २०२६ ते २९ मे २०२६ दरम्यान धावेल, तर ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद विशेष (शनिवार) २८ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांच्या थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, ०९०५७ या गाडीचे आरक्षण २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले आहे, तर ०९४२४ गाडीचे आरक्षण २६ मार्च २०२६ पासून उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in� या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा RailOne/N TES अॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.


