दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; खासदार नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ ट्रेन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने कोकणवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही रेल्वे सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या ट्रेनच्या अभावामुळे विशेषतः दैनिक मजूर, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना मोठ्या आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार राणे यांनी पत्रात स्पष्ट केले की, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनतेसाठी ही रेल्वे सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय होती. मात्र, ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे किंवा इतर ओव्हरक्राउडेड गाड्यांतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोकणातील सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कटत असून, जनभावनेचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. कोकणच्या विकासासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी ही ‘पॅसेंजर’ सेवा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search