नवी दिल्ली : पटना ते टाटानगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर २१८९६) मध्ये १५ मार्च २०२६ रोजी जेवणात सर्व्ह केलेल्या अमूल दहीत जिवंत किडे आढळल्याची तक्रार प्रवाशाने केल्यानंतर भारतीय रेल्वेने कठोर पावले उचलली आहेत.प्रवासी ऋतेश कुमार सिंह यांनी जेवणाच्या वेळी दही उघडल्यावर त्यात किडे फिरत असल्याचे पाहिले. केवळ एका कंटेनरपुरते मर्यादित न राहता अनेक दहीच्या कंटेनर्समध्ये हा दोष आढळला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या घटनेची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंत्रालयाने खालील कारवाई केली:
आयआरसीटीसी वर ₹१० लाख दंड
सेवा पुरवठादार कंपनी वर ₹५० लाख दंड
सेवा पुरवठादाराचा करार तत्काळ रद्द
रेल्वेने स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सुरक्षितता आणि जेवणाच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारच्या अन्न सुरक्षा उल्लंघनाला शून्य सहनशीलता धोरण असल्याचे रेल्वेने सांगितले.प्रवाशांनी सांगितले की, दही ४ मार्च रोजी तयार झाले होते आणि १५ मार्च रोजी सर्व्ह केले गेले, म्हणजे सुमारे ११ दिवसांचे अंतर होते. स्टाफने सुरुवातीला किड्यांना केशर समजले होते, मात्र नंतर वस्तुस्थिती स्पष्ट झाली.ही घटना वंदे भारत सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये घडल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी रेल्वेने सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.
अन्न पॅकेट उघडण्यापूर्वी त्याची तपासणी करावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ ट्रेन स्टाफ किंवा आयआरसीटीसी अॅपद्वारे तक्रार नोंदवावी. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Serious concerns raised again over food quality in Vande Bharat Express.
A passenger found a worm in curd, but the attendant shamelessly tried to pass it off as “saffron.” The truth came out when the worm was seen moving on the plate video now viral.
After the outrage, Indian… pic.twitter.com/gnCJ4EUXSW— The Nalanda Index (@Nalanda_index) March 25, 2026


