Konkan Railway: रेल्वे रूळ क्रॉसिंग अपघात रोखण्यासाठी आयोजित सेमिनार कोकणरेल्वे मुख्यालयात पार

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेने सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी अधिक मजबूत करत लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील (LC Gates) सुरक्षा आणि जनजागृती वाढवण्यासाठी २६ मार्च २०२६ रोजी बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उच्चस्तरीय सेमिनार आयोजित केला. या सेमिनारमध्ये गेटमॅन, सुपरवायझर, स्टेशन मास्टर आणि लोको पायलट अशा विविध कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषवले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

या सेमिनारमध्ये लेव्हल क्रॉसिंगवरील उपकरणांचा योग्य वापर, सुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणती कार्यपद्धती अवलंबावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेसाठी फ्लॅंजची रुंदी आणि उंची योग्य राखण्यावरही भर देण्यात आला. रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी गेटजवळ स्पष्ट साइनबोर्ड आणि मार्किंग असणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या वेळी गेट परिसरातील रस्त्यांची देखभाल सुधारण्याची गरज व्यक्त करत, टिकाऊ रबर लेव्हल क्रॉसिंग पॅनेल्स बसवण्याचे फायदे सांगण्यात आले. या पॅनेल्समुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळेल आणि देखभालही सुलभ होईल. सेमिनारमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करून सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search