मुंबई, २८ मार्च २०२६: मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास पुन्हा एकदा असुरक्षित ठरला आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:१४ च्या बदलापूर लोकल ट्रेनवर दादर रेल्वे स्थानकाच्या अगदी आधी मोठा दगड फेकण्यात आला. या घटनेत महिलांच्या डब्यात बसलेल्या एका महिलेला डोळ्याला गंभीर जखम झाली.
ही गाडी दादर स्टेशनजवळ जस्ट थांबत असताना डाव्या बाजूने (लेफ्ट साइड) जोरदार दगड आला आणि थेट महिलांच्या डब्यात घुसला. तो दगड एका महिलेच्या डोळ्याखाली लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. सहप्रवासी महिलांनी तिची मदत केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) यांनी घटनेची दखल घेतली आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ला तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना गेल्या काही दिवसांत वारंवार घडत आहेत. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेससह इतर ट्रेनांवरही अशा घटना घडल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अज्ञात दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
धक्कादायक! बदलापूर लोकलवर दगडफेक; महिलेला डोळ्याला गंभीर दुखापत. प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. दोषींवर कठोर कारवाईची मागणी.https://t.co/My8aLsIY2L#MumbaiLocal #RailwaySafety #BreakingNews pic.twitter.com/G5I5flW1t5
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 28, 2026


