Author Archives: Kokanai Digital

९ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 07:47:53 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 23:56:05 पर्यंत
  • करण-गर – 07:47:53 पर्यंत, वणिज – 19:43:50 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 14:57:55 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:54
  • सूर्यास्त- 18:45
  • चन्द्र-राशि-मिथुन – 17:46:37 पर्यंत
  • चंद्रोदय- 14:30:00
  • चंद्रास्त- 28:15:00
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1796 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ यांनी पहिली बायको ‘जोसेफिना’ यांच्यासोबत लग्न केले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
  • 1959 : बार्बी ही जगप्रसिद्ध बाहुली लाँच झाली.
  • 1991 : युगोस्लाव्ह अध्यक्ष ‘स्लोबोदान मिलोसेविक’ यांच्या विरोधात राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने
  • 1992 : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्लीत के. के. बिर्ला प्रतिष्ठानने आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1824 : ‘अमासा लेलँड स्टॅनफोर्ड’ – अमेरिकन स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1893)
  • 1863 : ‘भाऊराव बापूजी कोल्हटकर’ – गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1901)
  • 1899 : ‘यशवंत दिनकर पेंढारकर‘ – महाराष्ट्राचे कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1985)
  • 1930 : ‘युसुफखान महंमद पठाण’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म.
  • 1931 : ‘डॉ. करणसिंग’ – माजी केंद्रीय मंत्री.
  • 1933 : ‘लॉयड प्राइस’ – अमेरिकन गायक-गीतकार.
  • 1934 : ‘युरी गगारीन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1968)
  • 1935 : ‘अँड्र्यू वितेर्बी’ – क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक.
  • 1943 : जेम्स ऊर्फ ‘बॉबी फिश’र अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2008)
  • 1951: ‘झाकीर हुसेन’ – प्रख्यात तबलावादक -पद्यभूषण, पद्मश्री उस्ताद.
  • 1952: ‘सौदामिनी देशमुख’ – पहिल्या वैमानिक कप्तान.
  • 1956 : ‘शशी थरूर’ – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ.
  • 1970 : ‘नवीन जिंदाल’ – भारतीय उद्योगपती.
  • 1985 : ‘पार्थिव पटेल’ – भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
  • 1851: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1777)
  • 1888 : जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: 22 मार्च 1797)
  • 1969 : सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ‘होमी मोदी’ – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1881)
  • 1992 : ‘मेनाकेम बेगीन’ इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1913)
  • 1994 : ‘देविका राणी’ पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1908)
  • 2000 : अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

HSRP Number Plate: सावधान! हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नोंदणी करण्यासाठी आपण वापरत असलेली वेबसाइट बनावट तर नाही ना? बनावट आणि खऱ्या वेबसाइटच्या नावांची यादी ईथे वाचा…

   Follow us on        

HSRP Number Plate Update: राज्यामध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट राज्य सरकारने अनिवार्य केली आहे. येत्या 30 एप्रिलपासून राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक असणार आहे. यानंतर तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक झाल्यामुळे अनेकांनी या नंबर प्लेट लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता यामध्येही अडथळे येत असल्याचं दिसतंय. सायबर गुन्हेगारांनी यामध्ये आपला डाव साधला आहे.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने एक वेबसाइट दिली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी येथेही अनेक बनावट वेबसाइट तयार केल्याचं आढळतंय. यावरुन ते सर्व सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे तुम्हीही ऑनलाइन एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करत असाल तर सावध व्हा.

तुम्ही जेव्हा तुमच्या वाहनांची नोंदणी करता तेव्हा ती वेबसाइट ही परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करा. कारण शुल्काच्या बहाण्याने वाहन चालकांची मोठी फसवणूक केली जातेय.

बनावट संकेतस्थळांची (वेबसाईट्स) नावे

1-https://bookmyhssp.in/maharashtra.html

2-https://bookedmyhsrp.com/registration

3- https://www.bookmehsrp.com

4- https://bookingmyhsrp.com

5- https://indnumberplate.com

6- https://hsrprto.in

अधिकृत संकेतस्थळांची नावे

  1. https://mhhsrp.com
  2. https://hsrpmhzone2.in
  3. https://maharashtrahsrp.com

टीप: ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून नागरिकांत जागरूकता आणावी.

Foreign Investment: इथेही महाराष्ट्र अव्वल! केवळ 9 महिन्यात आली गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक

   Follow us on        
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रर फडणवीस यांनी दिली आहे.
असे करताना महायुती सरकारने आपलाच २०१६-१७  या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील. अशा शब्दात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.

ब्राझील दौऱ्यात काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा करार- आ. दीपक केसरकर

   Follow us on        
काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरु केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते आज बोलत होते.
2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. 3 हजार 200 कोटीचे काजू बोंड वाया जाते. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात, असे केसरकर म्हणाले.
तसेच ब्राझील येथे भारतील गाईंचे संवर्धन केले आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

८ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 08:19:08 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 23:29:24 पर्यंत
  • करण-कौलव – 08:19:08 पर्यंत, तैतुल – 19:59:38 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 16:23:51 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:55
  • सूर्यास्त- 18:44
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 13:30:00
  • चंद्रास्त- 27:25:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1817 : ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज’ (NYSE) ची स्थापना.
  • 1942 : जपानने म्यानमारची राजधानी ‘रंगून’ ताब्यात घेतली.
  • 1948 : या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला.
  • 1948: एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
  • 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
  • 1957 : ‘घाना’ देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1974 : पॅरिस, फ्रान्समध्ये ‘चार्ल्स डी गॉल’ विमानतळ सुरू झाले
  • 1979 : फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली.
  • 1993: दमानिया एअरवेज या खाजगी विमान कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ जेआरडी’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • 1998: भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष ‘रमाकांत देसाई’ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2009: भारतीय गोल्फपटूने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.
  • 2016: इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिकमधून संपूर्ण सूर्यग्रहण दृश्यमान आहे.
  • 1911: आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864: ‘हरी नारायण आपटे’ – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: 3 मार्च 1919)
  • 1879: ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: 28 जुलै 1968)
  • 1889: ‘विश्वनाथ दास’ – ओडीसा चे माजी मुख्यमंत्री .
  • 1921: ‘अब्दूल हयी’ ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ –  शायर व गीतकार (मृत्यू: 25 आक्टोबर 1980)
  • 1928: ‘वसंत अनंत कुंभोजकर’ – कथालेखक.
  • 1930: ‘चिंतामणी त्र्यंबक खानोलकर’ ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: 26 एप्रिल 1976)
  • 1931: ‘मनोहारी सिंग’ – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: 13 जुलै 2010)
  • 1953: ‘वसुंधरा राजे सिंधिया’ – राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री  यांचा जन्म.
  • 1954: ‘दिगंबर कामत’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री..
  • 1963: ‘गुरशरणसिंघ’, – भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • 1969: ‘उपेंद्र लिमये’ -मराठी चित्रपट अभिनेता .
  • 1974: ‘फरदीन खान’ – हिन्दी चित्रपट कलाकार
  • 1989: ‘हर्मंप्रीत कौर’ – भारतीय महिला क्रिकेटर
  • 1886: ‘एडवर्ड कालव्हिन केन्डॉल’ – जीवरसायन शास्रज्ञ .
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1535: ‘कर्णावती’ – मेवाड ची राणी.
  • 1702: ‘विल्यम’ (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: 14 नोव्हेंबर 1650)
  • 1942: ‘जोस रॉल कॅपाब्लांका’ – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: 19 नोव्हेंबर 1888)
  • 1957: ‘बाळ गंगाधर’ तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: 24 ऑगस्ट 1888)
  • 1972: ‘तरुण बोस’ – भारतीय चित्रपट अभिनेता.
  • 1988: ‘अमरसिंग चमकिला’ – पंजाबी गायक.
  • 2009: गिरधारीलाल भार्गव – लोकसभेचे माजी सदस्य.
  • 2015: ‘विनोद मेहता’ – प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Mandangad: तब्बल २७५ माकडे पकडून सोडली नैसर्गिक अधिवासात!

No block ID is set

मंडणगड: शहरातील नागरिक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाच्यावतीने 28 फेब्रुवारीपासून तालुक्यात वनविभागाच्यावतीने माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 275 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात कार्यवाही करण्यात आली.

उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक प्रियांका लगड, दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात आठ दिवस राबवण्यात येणार आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणी शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येत आहे. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येते. मंगळवारी शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पकडण्यात आली. वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल ब्रिहाडे, समाधान गिरी व सहकारी पाटील यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. यावेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील सोवेली, वेळास, बाणकोट, वेसवी, उमरोली, शिपोळे गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Fact Check: कोकणातील परुळे गावात सिंहाचा वावर? नेमके सत्य काय?

   Follow us on        
Fact Check: पाट-परुळे रोडवर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सिंह आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र हा व्हिडिओ कोकणातील परुळे गावातील नसून तो व्हिडिओ गुजरात मधील केर गावातील जुना व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.
पाट-परुळे रोडवर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी सिंह आला असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ जुना असून सोशल मीडियावर विविध ठिकाणच्या नावाने व्हायरल होत आहे. सिंहाचा हा व्हिडिओ गुजरात येथील किर गावातील असल्याची माहीती परुळे येथील वेतोबा पेट्रोल पंपाचे मालक निलेश सामंत यांनी दिली आहे.हा व्हिडिओ जुना आहे.तसेच इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ गुजरात मधील केर गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सिंहाच्या व्हिडिओवर कुणीही परूळे गावासह जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवू नये.

७ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 09:21:15 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 23:32:52 पर्यंत
  • करण-भाव – 09:21:15 पर्यंत, बालव – 20:46:21 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-प्रीति – 18:14:09 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:55
  • सूर्यास्त- 18:44
  • चन्द्र-राशि-वृषभ – 11:45:57 पर्यंत
  • चंद्रोदय- 12:30:00
  • चंद्रास्त- 26:29:00
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1771 : हैदर आणि मराठे यांच्यात मोती तलावाची लढाई झाली.
  • 1876 : “अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल” यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
  • 1936 : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
  • 2009 : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
  • 2024: स्वीडन अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाला आणि त्याचा ३२ वा सदस्य बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1508 : “हुमायून” – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: 17 जानेवारी 1556)
  • 1765 : “निसेफोरे नाऐप्से” फोटोग्राफी चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू:  जुलै 1833)
  • 1792 : “सर जॉन विल्यम हरर्षेल” ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे  संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1871)
  • 1849 : “ल्यूथर बरबँक” महान वनस्पतीतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 एप्रिल 1926)
  • 1911 : “सच्चिदानंद हिराचंद वात्सायन” ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1987 )
  • 1918 : “स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर”  मराठी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1955 : चित्रपट अभिनेते “अनुपम खेर” यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1647: ‘दादोजी कोंडदेव’ – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू यांचे निधन.
  • 1922: ‘गणपतराव जोशी’ – रंगभूमी नट यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1867)
  • 1952: ‘परमहंस योगानंद’ – तत्वज्ञ यांचे निधन.
  • 1961: ‘पंडित गोविंदवल्लभ पंत’ – भारतरत्न यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1887)
  • 1974: ‘टी. टी. कृष्णमाचारी’ – माजी अर्थमंत्री यांचे निधन.
  • 1993: ‘इर्झा मीर’ – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1900)
  • 2000: ‘प्रा. प्रभाकर तामणे’ – कथालेखक यांचे निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1931)
  • 2012: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 3 मार्च 1926)
  • 2015: ‘जी. कार्तिकेयन’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1949)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: होळी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने होळी सणा दरम्यान म्हणजेच दिनांक 13 मार्च ते 16 मार्च पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर पनवेल – चिपळूण विशेष मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा अधिक तपशील खालीलप्रमाणे

गाडी क्रमांक 01018 / 01017 चिपळूण – पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष गाडी

चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू विशेष (01018) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान दररोज चिपळूण वरून दुपारी 15:25 वाजता निघेल आणि पनवेल येथे रात्री 20:20 वाजता पोहोचेल.

पनवेल – चिपळूण अनारक्षित मेमू विशेष (01017) ही गाडी दिनांक 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान पनवेल वरून रात्री 21:10 वाजता सुटून चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 02:00 वाजता पोहोचणार आहे.

थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण.

डब्यांची रचना: ८ कार मेमू

सिंधुदुर्ग जिल्हय़ात लवकरच धावणार एसटीच्या मिनी बसेस

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.

या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search