Author Archives: Kokanai Digital

उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे

   Follow us on        

मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.

या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

(Also Read :नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्‍वरवासियांचा इशारा

अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.

सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता

परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता

मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे 

मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये

(Also Read > कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.

ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

Loading

कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचे भारतात 3 रुग्ण

BF7 Variant Threat :चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

   Follow us on        

मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत

Loading

ख्रिसमससाठी मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान एक विशेष गाडी…

   Follow us on        

Konkan Railway News :  ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.

खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

Train no.  01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस 

ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.

Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस 

ही गाडी दिनांक 22/12/2022 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल

Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस  

ही गाडी दिनांक 24/12/2022 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 14.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 23.00 वाजता  मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.

ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.

ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना

एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 02  + टू टायर एसी – 02 असे मिळून एकूण  20 डबे

वेळापत्रक

S.N. Station Name 01461(DN) 01462(UP)
1 C SHIVAJI MAH T 15:30 23:00
2 DADAR 15:45 22:33
3 THANE 16:08 21:22
4 PANVEL 16:55 20:25
5 ROHA 18:15 19:15
6 CHIPLUN 20:12 14:52
7 RATNAGIRI 21:55 13:05
8 KANKAVALI 23:32 10:48
9 SINDHUDURG 23:52 10:34
10 SAWANTWADI ROAD 00:22 10:12
11 MADGAON 02:10 09:00
12 KARWAR 03:12 07:52
13 UDUPI 06:02 05:44
14 MANGALURU JN 08:10 04:20
15 KASARAGOD 08:50 03:07
16 KANNUR 10:00 02:03
17 THALASSERY 10:20 01:35
18 KOZHIKKODE 11:20 00:40
19 TIRUR 12:00 00:12
20 SHORANUR JN 13:05 23:25
21 THRISUR 13:43 22:20
22 ERNAKULAM JN 15:00 20:45
23 KOTTAYAM 16:25 19:05
24 TIRUVALLA 16:55 18:16
25 CHENGANNUR 17:06 18:06
26 KAYANKULAM JN 17:30 17:45
27 KOLLAM JN 18:15 17:10
28 TRIVANDRUM CNTL 20:45 16:05
29 KULITTHURAI 21:30 15:15
30 NAGERCOIL JN 22:20 14:45
31 KANYAKUMARI 23:20 14:15

(Also Read : नाताळासाठी गोवा आणि कोकणात जाणार्‍या पर्यटकांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या..)

Loading

गांधीधाम – तिरुनवेल्ली – गांधीधाम गाडी धावणार अतिरिक्त कोच सहित

   Follow us on        
Konkan Railway News : कोंकण रेल्वेने कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20923/20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी जी ह्या आधी २१ LBH डब्यांसहित चालविण्यात येत होती ती आता २२ LBH डब्यांसहित चालविण्यात येणार आहे. १ स्लीपर कोच कायमस्वरूपी ह्या गाडीला जोडण्यात येणार आहे.
ट्रेन नंबर 20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली वीकली एक्सप्रेस हि गाडी दिनांक ०२/०१/२०२३ पासून तर 20923 तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी ०५/०१/२०२३ पासून ह्या अतिरिक्त डब्यासहीत चालविण्यात येणार आहे.

 

हेही वाचा : कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

 

Loading

कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मागील 12 वर्षांपासुन रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत.

Mumbai-Goa Highway News:कोकणाच्या समृद्धीसाठी ‘मुंबई-गोवा महामार्ग’ सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केले आहे.

   Follow us on        

आपण ह्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत पण बोलणे झाले. समृद्धी महामार्ग जर कमी वेळात पूर्ण होऊ शकतो तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामात काय अडथळे येत आहेत असे असा सवाल त्यांनी नितीन गडकरी यांना केला. तुम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणुन तुम्ही लक्ष घालून हे काम पूर्णत्वास न्या या माझ्या विनंतीवर गडकरी यांनी आठ ते दहा दिवसांत ह्या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या बसला भीषण आग.. सुदैवाने जिवितहानी नाही..

सिंधुदुर्ग, दि. 21/12/2022 : आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालत्या लक्झरी बसला आग लागली. सुदैवाने ह्या अपघातात जिवितहानी झाली नाही पण बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .

   Follow us on        

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.

Loading

ग्रामपंचायत निवडणूक-2022 निकाल(Live-19:00)

   Follow us on        

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ –  संपूर्ण महाराष्ट्र – पक्षनिहाय 

पक्ष ग्रामपंचायतीसरपंच
भाजप22411987
शिंदे गट772709
ठाकरे गट668571
राष्ट्रवादी15121263
काँग्रेस1038796
इतर 1255989

माविआ : 2715
शिंदे-भाजप : 2795
इतर : 1135

कोकणातील स्थिती

पक्षनिहाय ग्रामपंचायती

पक्ष रत्नागिरीसिंधुदुर्गरायगडपालघरठाणे
भाजप17182181113
शिंदे गट4524790214
ठाकरे गट1017438074
राष्ट्रवादी080245040
काँग्रेस030103000
इतर 472157394

 

 

Loading

नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती..

Mumbai News:मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय दंत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर आहे. नियुक्त उमेदवारांना पालिकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.

पुढील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

डाटा ऑपरेटर : एकूण पदे ५
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी टंकलेखन उत्तीर्ण,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष

एक्स रे टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण विषयातील बीपीएमटी हा पूर्णवेळ ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम व सहा महिन्यांची इंटर्नशीप,
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष

अधिपरिचारीका : ४ पदे
शैक्षणिक अर्हता : बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्लोमा धारक असावा कंवा साडेतीन वर्षाँचा कालावधी पूर्ण झालेला अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

बहुउद्देशीय कामगार : १२ पदे
शैक्षणिक अर्हता : इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा, मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी.
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

सुतार (कारपेंटर) : १ पद
शैक्षणिक अर्हता: आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्याबाबतचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
नळ कारागीर (प्लंबर) : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा त्यासंदर्भातील अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १८ ते ३८ वर्षे
एसी टेक्निशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्ल्यूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

इलेक्ट्रीशियन : १ पद
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

वायरमन कम लिफ्टमन
शैक्षणिक अर्हता : आयटीआय उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाचे उत्तीर्ण त्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक किंवा पीडब्लूडी परवाना बंधनकारक
वयाची अट : १८ ते ३८ वर्षे

इलेक्ट्रीकल हेल्पर
शैक्षणिक अर्हता : किमान आठवी पास व विद्युत कामाचा अनुभव असणे आवश्यक, मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
वयाची अट : १८ ते ३८

अधिक माहितीसाठी ईथे क्लिक करा 👉🏻 MAHANAGAR PALIKA VACANCY.pdf

Loading

“मुंबई गोवा हायवेच सार कामच बिघडल!” कोंकणवासिंयाची व्यथा गजरातून (भजनातून) व्यक्त

Mumbai-Goa Highway :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. ह्याविषयी कोकणवासियांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. हाच आक्रोश आता एका भजनातून-गजरातून व्यत्क्त केला गेला आहे. श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळद्वारे हा गजर YOUTUBE ह्या माध्यमावर प्रसिद्ध केला आहे.

ह्या गजराचे शब्दांकन केले आहे श्री बाबाजी हरिचंद्र आमडोस्कर (हरि सुत), तर बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी यांनी ह्या गजराला संगीत दिले आहे. त्यांना साथ दिली आहे……

Also Read : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्प सहलीचे आयोजन…

संगीत / गायक – बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
झुंजरी/ कोरसः- श्री राजेश परब.
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
कोरस:- श्री अजित डिंगंणकर.
कोरस:- श्री सुनिल टिळेकर.
झांज:- श्री लक्ष्मण (गणेश) घाडीगांवकर .
Thumbnail :- कु. सौरभ आंगचेकर.

गजराची रचना (शब्द)

आज होतय म्हणता उद्या होईल बारा वर्षे रखडल
आमच्या मुंबई गोवा हायवेच सारं कामच बिघडल

आले मंत्री गेले मंत्री आणि गेले किती शासन
समृद्धी झाली अती वेगाने ईथे पोकळ आश्वासन
सिंधुदुर्ग झाला सुसाट तरी रायगड रत्नागिरीत अडलं

नाही कधीही कुठेच मोर्चा कधी नाही आंदोलन
शांत संय्यमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन
दुःख सोसल गप्प राहूनी कधी नाही कुठे मांडल

अट्टाहास ना कधी कशाचा स्वाभिमानी बाणा
ठेऊनी पाठीवरी हात फक्त लढ एवढेच म्हणा
किती सोसल नुकसान तरी कधी नाही कुठे ताडलं

“गड”करी तील सर ही उरली एकच आशा
नव शासन देईल का नवी कोकणाला दिशा
गाऱ्हाणे हे कोकणाचे आज हरी सुताने मांडल

Loading

कोकणरेल्वेच्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावणार

Konkan Railway News :कोकणरेल्वेच्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. कोकण रेल्वेचं १००% विद्युतीकरण करण्याचा निर्धार केला गेला आहे. ह्या आधी बहुतेक गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.त्यात भर म्हणून खालील गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.

   Follow us on        

मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०/१२६१९) ही दिनांक १८ डिसेंबरपासून पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.

(Also  Read:सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्प सहलीचे आयोजन… )

तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस गाडी (२२६५३/२२६५४) ही दिनांक १७ डिसेंबर पासून पासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.

तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६३३/२२६३४) दिनांक २१ डिसेंबर पासून पासून विजेवर धावणार आहे.

कोचुवेली ते योगनगरी ऋषिकेश दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस(२२६५९/२२६६० ) आहे. ही गाडी २३ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे.

(Also Read : पनवेल नांदेड एक्सप्रेस चिपळूणपर्यंत विस्तारित करण्याची मागणी.)

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search