Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या उन्हाळी विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र प्रवाशांचा ओघ वाढल्याने गर्दी होऊन त्यांचा प्रवास त्रासदायक होत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या एका साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष गाडी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर  धावणाऱ्या गाडी क्रमांक गाडी क्र. ०११०४ / ०११०३  मडगाव  – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव उन्हाळी विशेष या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०८ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक २६/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला आता ०९ जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

३० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- चतुर्थी – 21:25:52 पर्यंत
  • नक्षत्र- पुनर्वसु – 21:30:29 पर्यंत
  • करण- वणिज – 10:17:57 पर्यंत, विष्टि – 21:25:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- गण्ड – 12:56:27 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र राशि- मिथुन – 15:43:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:58:59
  • चंद्रास्त- 22:45:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1574 : हेन्री (तृतीय) फ्रान्सचा राजा झाला.
  • 1631 : पहिले फ्रेंच वृत्तपत्र, गॅझेट डी फ्रान्स प्रकाशित झाले.
  • 1858 : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी तात्याटोपेच्या मदतीने ग्वाल्हेरवर आक्रमण केले.
  • 1919 : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली.
  • 1922 : वॉशिंग्टन डीसीमध्ये लिंकन मेमोरियल समर्पित करण्यात आले.
  • 1934 : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
  • 1942 : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या 1000 विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
  • 1974 : एअरबस ए-300 विमान सेवेत दाखल.
  • 1975 : युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली.
  • 1987 : गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
  • 1993 : पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
  • 1998 : अफगाणिस्तान मधील 6.5 मेगावॅट क्षमतील भूकंपात 4000 ते 4500 लोक ठार झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1894 : ‘डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर’ – इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 1969)
  • 1916 : ‘दीनानाथ दलाल’ – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 1971 – मुंबई)
  • 1947 : ‘व्ही. नारायणसामी’ – पुडुचेरीचे 10 वे मुख्यमंत्री.
  • 1949 : ‘बॉब विलीस’ – इंग्लिश जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1950 : ‘परेश रावल’ – अभिनेते यांचा जन्म.
  • 1983 : अभिषेक शर्मा उर्फ ‘कृष्णा अभिषेक’ – भारतीय अभिनेता, विनोदकार, दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता आणि निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1574 : फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म : 27 जून 1550)
  • 1778 : ‘व्होल्टेअर’ – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक यांचे निधन. (जन्म : 21 नोव्हेंबर 1694)
  • 1912 : ‘विल्बर राईट’ – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचे निधन. (जन्म : 16 एप्रिल 1867)
  • 1941 : थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1893)
  • 1950 : ‘दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर’ – प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन.
  • 1955 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1879)
  • 1968 : ‘सावळाराम लक्ष्मण हळदणकर’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1882)
  • 1981 : ‘झिया उर रहमान’ – बांगलादेशचे 7 वे राष्ट्राध्यक्ष यांची हत्या. (जन्म : 19 जानेवारी 1936)
  • 1989 : ‘दर्शनसिंहजी महाराज’ – शिख संतकवी यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1921)
  • 1989 : ‘वीर बहादूर सिंग’ – भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे 14 वे मुख्यमंत्री यांचे निधन.
  • 2007 : ‘गुंटूर सेशंदर शर्मा’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 20 ऑक्टोबर 1927)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबे मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे सरसावले आहेत. गाडी क्रमांक 12051/12052 जन्मशताब्दी एक्सप्रेस आणि 16345/16346 नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. या मागणीला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन गाडयांना या स्थानकावर थांबा देण्याची मागणी करणारे निवेदन केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना लिहून पाठवले आहे.

मुख्यमंत्री या निवेदनात लिहितात….

विषय: राजापूर रोड रेल्वे स्टेशन, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे गाड्यांना थांबा मंजूर करण्याची विनंती.

प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,

कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वे स्टेशन हे कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या भागांच्या जवळ आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक अत्यंत लोकसंख्येच्या क्षेत्राला सेवा देत आहे. हे स्टेशन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, आंबा आणि काजू व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे.

सांगली जिल्ह्यातील आमदार सदाभाऊ खोत यांनी खालील गाड्यांमध्ये गाड्यांना राजापूर येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.

१. १२०५१ /१२०५२ मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

२. १६३४५ /१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस

मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राजापूर रोड रेल्वे स्थानकावरील थांब्याच्या या मागणीवर विचार करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात.

हार्दिक शुभेच्छा,

आपला विनम्र.

(देवेंद्र फडणवीस)

Dodamarg: दोन कार समोरासमोर धडकल्याने अपघात

   Follow us on        

दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Sindhudurg: जिल्ह्यात ४३ गावांत दरडी कोसळण्याचा धोका, कोकण रेल्वे, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर मार्गावरील ही ठिकाणेही धोकादायक

   Follow us on        
सिंधुदुर्ग : आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण ४३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय कोकण रेल्वे मार्ग व राज्य, राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळते, अशी ठिकाणेही प्रशासनाने निश्चित केली आहे.
यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल इन्सुली, आंबोली, मळेवाड, वेत्ये, कणकवली तालुक्यात रांजणगाव, खुर्द, कुंभवडे, फोडा, वैभववाडी तालुक्यात नाध वडे, करुळ-भट्टीवाडी, दिंडवणेवाडी-धनगरवाडी, वेंगुर्ले तालुक्यात तुळस काजरमळी, तुळस रेवटीवाडी, तुळस वाघोसेवाडी, वायंगणी डोमवाडी, म्हापण, कोचरा, मोचेमाड घाट, तुळस, रामघाट रोड, बडखोल, निवती मेढा, देवगड तालुक्यातील मोर्वे, नारिग्रे, दहिबाव, पाळेकरवाडी, पोयरे, मुणगे, खुडी, कुवळे, तोरसोळे, सादशी, गढीताम्हाणे, कुडाळ तालुक्यातील वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारुर, घोटगे, दुर्गानगर, भरणी, मालवण, वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी, अशा एकूण ४३ गावांचा समावेश आहे. सर्वेक्षणानुसार या गावांत दरड कोसळण्याची शक्यता आहे.
राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील दरड प्रवण ठिकाणे 
देवगड उपविभाग-विजयदुर्ग, पडेल जामसंडे, कुणकेश्वर आचरा-मालवण-रेवस रेवंडी रस्ता (प्रमुख राज्यमार्ग) देवगड निपाणी रस्ता राक्षस घाटी (राज्यमार्ग) वैभववाडी उपविभाग-गगनबावडा, मुईबावडा खारेपाटण रस्ता भुईबावडा घाट (राज्यमार्ग) पडेल वाघोटण तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता-करुळ घाट (राष्ट्रीय महामार्ग), कणकवली उपविभाग-देवगड निपाणी रस्ता फोंडाघाट पडेल वाघोटन तळेरे रस्ता (राज्यमार्ग) सावंतवाडी उपविभाग वेंगुर्ले-सावंतवाडी-आंबोली बेळगाव-आंबोली घाट (राष्ट्रीय महामार्ग.)
कोकण रेल्वे मार्गावरील दरडग्रस्त ठिकाणे 
वैभववाडी-लाडवाडी अॅप्रोच कटिंग, गोपालवाडी अॅप्रोच डिप कटिंग, चिंचवली डिप कटिंग, बेर्ले टनेल, वैभववाडी आणि देवगड-नापणे कटिंग, देवगड आणि कणकवली-बेळणा, कणकवली आणि कुडाळ-बोर्डवे कटिंग, सावंतवाडी-नेमळे. सद्यस्थितीत या ठिकाणी दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अति पाऊस झाल्यास या ठिकाणी दरड पडण्याचा धोका संभवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • आजचे पंचांग
  • तिथि- तृतीया – 23:21:15 पर्यंत
  • नक्षत्र- आर्द्रा – 22:40:04 पर्यंत
  • करण- तैतिल – 12:34:50 पर्यंत, गर – 23:21:15 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- शूल – 15:46:49 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:00:32
  • सूर्यास्त- 19:11:09
  • चन्द्र राशि- मिथुन
  • चंद्रोदय- 07:52:59
  • चंद्रास्त- 21:51:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • यु.एन. शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1727 : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
  • 1848 : विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य बनले.
  • 1914 : ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात 1992 लोक ठार झाले.
  • 1919 : अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
  • 1953 : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.
  • 1999 : स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
  • 2007 : जपान देशाच्या महिला रियो मोरी यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1906 : ‘टी. एच. व्हाईट’ – भारतीय-इंग्लिश लेखक यांचा जन्म.
  • 1914 : ‘शेर्पा तेनसिंग नोर्गे’ – एव्हरेस्टवीर यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1986)
  • 1917 : ‘जॉन एफ. केनेडी’ – अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 नोव्हेंबर 1963)
  • 1929 : ‘पीटर हिग्ज’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1961 : ‘विजय पाटकर’ – मराठी व हिंदी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1814 : ‘जोसेफिन डी बीअर्नार्नास’ – नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी यांचे निधन.
  • 1829 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1778)
  • 1892 : ‘बहाउल्ला’ – बहाई पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1817 – तेहरान, इराण)
  • 1972 : ‘पृथ्वीराज कपूर’ – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1901)
  • 1977 : ‘सुनीतिकुमार चटर्जी’ – भाषाशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1890)
  • 1987 : ‘चौधरी चरणसिंग’ – भारताचे 5 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 23 डिसेंबर 1902)
  • 2007 : ‘स्‍नेहल भाटकर’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 17 जुलै 1919)
  • 2010 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 26 ऑगस्ट 1922)
  • 2020 : ‘अजित जोगी’ – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ 

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या गाडीची मुदत दिनांक ०५ जून २०२५ रोजी संपत होती तिला आता २६ जून  २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०२/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक ०५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २६/०६/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०९/०६/२०२५ ते २३/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १२/०६/२०२५ ते २६/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी भेट

   Follow us on        
Konkan Railway:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी काल  केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.
याचबरोबर त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा तसेच कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याविषयी चर्चा केली.

खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली निवेदने

२८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- द्वितीया – 25:57:34 पर्यंत
  • नक्षत्र- मृगशिरा – 24:30:22 पर्यंत
  • करण- बालव – 15:28:14 पर्यंत, कौलव – 25:57:34 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 19:08:31 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय-06:00:41
  • सूर्यास्त-19:10:45
  • चन्द्र राशि- वृषभ – 13:37:54 पर्यंत
  • चंद्रोदय-06:47:59
  • चंद्रास्त-20:48:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • महिला आरोग्यावर आंतरराष्ट्रीय कृती दिन
  • जागतिक भूक दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1490 : जुन्नरचा बहामनी सेनापती मलिक अहमद याने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव केला आणि जुन्नरमध्ये स्वतंत्र सल्तनत घोषित केली.
  • 1907 : पहिली आयल ऑफ मॅन टीटी शर्यत आयोजित केली गेली.
  • 1918 : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • 1937 : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1937 : फोक्सवॅगन जर्मन ऑटोमोबाईल उत्पादन कंपनीची स्थापना.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1952 : ग्रीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1958 : स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
  • 1964 : पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली.
  • 1998 : पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगई भागात पाच यशस्वी अणुचाचण्या केल्या.
  • 1999 : लिओनार्डो दा विंचीचा द लास्ट सपर इटलीमध्ये चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले
  • 2008 : नेपाळमध्ये राजेशाहीची प्राचीन परंपरा संपुष्टात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1660 : ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1727)
  • 1759 : ‘छोटा विल्यम पिट’ – युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • 1883 : ‘विनायक दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1966)
  • 1903 : ‘शंतनुराव किर्लोस्कर’ – उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 1994)
  • 1907 : ‘दिगंबर विनायक’ तथा ‘नानासाहेब पुरोहित’ – स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1994)
  • 1908 : ‘इयान फ्लेमिंग’ – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑगस्ट 1964)
  • 1921 : ‘पं. दत्तात्रय विष्णू’ ऊर्फ ‘बापूराव पलुसकर’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑक्टोबर 1955)
  • 1923 : ‘एन. टी. रामाराव’ – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1996)
  • 1946 : ‘के. सच्चिदानंदन’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1787 : ‘लिओपोल्ड मोत्झार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1719)
  • 1961 : ‘परशुराम कृष्णा गोडे’ – प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1891)
  • 1982 : ‘बळवंत दामोदर’ ऊर्फ ‘कित्तेवाले निजामपूरकर’ – यांचे निधन.
  • 1994 : ‘गणपतराव नलावडे’ – हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर यांचे निधन.
  • 1999 : ‘बी. विट्टालाचारी’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Loading

Rajapur: अणूस्कुरा घाटात दरडीचा दगड अचानक रस्त्यावर

   Follow us on        
Rajapur: अणूस्कुरा घाटात सोमवारी एक मध्यम स्वरूपातील दगड रस्त्यावर येऊन पडला होता. स्थानिक ग्रामस्थांनी वाहन चालकांच्या सहकाऱ्याने तो दगड तत्काळ हटविला. मात्र सुदैवाने यादरम्यान तिथून कोणतंही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला.
अणूस्कुरा घाट वाहतूकीसाठी जरी अनुकूल वाटत असला तरी केव्हा दरड कोसळेल याचा काही नेम नाही, अशी स्थिती असते. गेल्या वर्षी दरड कोसळून मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वेळीच हटवून घाटमार्गे वाहतूक पूर्ववत सुरु केली होती.
अणूस्कुरा घाट (Anuskura Ghat) हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एक घाट आहे. हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे. अणुस्कुरा घाट कोकण आणि घाटमाथा यांना जोडतो, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे, त्यामुळे हा घाट कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने हा मार्ग धोकादायक बनतो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search