Author Archives: Kokanai Digital

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून २ दिवसांसाठी अवजड वाहनांना बंदी; कारण काय?

   Follow us on        
Mumbai Goa Highway:मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी ०५ जून २०२५ आणि शुक्रवारी ०६ जून २०२५ अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी याबाबत आदेश जारी केले आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्यासंख्येत रायगडावर येतात. त्यामुळे मुंबई- गोवा माहामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, येत्या ५ जून २०२५ सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ते ६ जून रात्री १०.०० वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव – निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.

Konkan Railway: पावसाळ्यात मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविणे अशक्य – मध्य रेल्वे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून सहा दिवस धावणारी २२२२९/३० मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पावसाळयात आठवड्यातून तीनच दिवस धावते. तर आठवड्यातून चार दिवस धावणारी ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस पावसाळ्यात दोनच दिवस धावते. जास्त मागणी असणाऱ्या या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्यांत कपात केल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना खासकरून खेड, कणकवली, सावंतवाडी, थिवीम इत्यादी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांच्या फेऱ्यात कपात करू नये अशी विनंती कोकण विकास समितीतर्फे मध्य रेल्वे प्रशासनाला ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.
 २२२२९/३० मुंबई – मडगाव एक्सप्रेस या गाडीला अतिरिक्त रेक उपलब्ध करून देऊन पावसाळ्यात सुद्धा ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. मात्र हा अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने आपल्या उत्तरात कळविले आहे. (Due to stabling constraints it is not feasible) तर ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी पावसाळ्यात आठवड्यातून चार दिवस चालविणे ही मागणी पूर्ण करणे कोकण रेल्वे च्या कक्षेत येते असे उत्तर देण्यात आले आहे. (Increase is frequency of this train during mansoon, matter pertains to Konkan Railway)
पावसाळ्यात फेऱ्यांत कपात करण्यात येणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Mumbai to Konkan RoRo Service : मांडवा -माझगाव ते रत्नागिरी -मालवण सागरी मार्गावर गणेशचतुर्थीपूर्वी रो रो सेवा सुरु करणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
रत्नागिरी : राज्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गासोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी मार्गाद्वारे रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, या निमित्ताने नवा अध्याय राज्यात सुरु होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या दौ-यावर असताना ते म्हणाले, राज्यात दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे बरोबर जलवाहतूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या रो रो जलसेवेमुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पाच तासात पोहोचता येणार आहे.
या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणे शक्य होणार आहे. यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यावेळ पत्रकारांना सांगितले.

०४ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथिनवमी- 23:56:35 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 27:36:05 पर्यंत
  • करण-बालव – 10:53:56 पर्यंत, कौलव – 23:56:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 08:27:57 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:00:03
  • सूर्यास्त- 19:13:23
  • चन्द्र-राशि-सिंह – 07:35:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:35:00
  • चंद्रास्त- 25:52:00
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
  • 1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
  • 1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
  • 1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
  • 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
  • 2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1738 : ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
  • 1904 : ‘भगत पुराण सिंह’ – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
  • 1910 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल्म’ – होव्हर्क्राफ्ट चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
  • 1915 : ‘मालिबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
  • 1936 : ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
  • 1946 : ‘एस.पी. बालसुब्रह्मण्यम’ – दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण यांचा जन्म.
  • 1947 : ‘अशोक सराफ’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.
  • 1959 : ‘अनिल अंबानी’ – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
  • 1975 : ‘अँजेलिना जोली’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1990 : ‘जेत्सुनपेमा वांग्चुक’ – भूतानची राणी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1918 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1947 : ‘पंडित धर्मानंद कोसंबी’ – बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
  • 1962 : ‘चार्ल्स विल्यम बीब’ – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ.अश्विन दासगुप्ता’ – इतिहासतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 2020 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1930)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

“संगमेश्वर स्थानकावर तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा” | शिष्टमंडळाने घेतली खासदार नारायण राणे यांची भेट.

   Follow us on        
संगमेश्वर | रुपेश मनोहर कदम/ सायले:  निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधीं, सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन निवेदन, आंदोलन, उपोषण,असे  मार्ग अवलंबले.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, बेलापूर येथील कार्यालयात निवेदन दिली. प्रत्यक्षात संघटनेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी को.रे. च्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकावर अन्याय का? ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करुन थांबा मिळावा म्हणून वारंवार विनंती करण्यात आली परंतु नेहमी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत त्यांच्याकडून मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याचे कोकण रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते होते.
अखेर हा विषय मांडण्यासाठी खासदार नारायण राणे यांची दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई येथे शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे श्री. दीपक पवार, श्री. संतोष पाटणे, श्री. मुकुंद सनगरे व श्री अशोक मुंडेकर हे उपस्थित होते. आपण आठवड्यात दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मंजुरीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे वचन नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिले असल्याने आता तीन गाड्यांच्या थांब्याच्या मागणीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या संघटनेने सांगितले आहे.
आता लवकरच आपल्या मागण्या मान्य होणार! संगमेश्वर येथील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Sindhudurg: शिवापूरच्या कन्येने पटकावले ”चल भावा सिटीत” शोचे विजेतेपद

   Follow us on        

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

०३ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 3 जून 2025
  • वार : मंगळवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : अष्टमी तिथी (रात्री 09:56 पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
  • नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (4 जून रात्री 12:58 पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
  • योग : हर्षण योग (सकाळी 08:07 पर्यंत) त्यानंतर वज्र योग
  • करण : विस्ती भद्रा करण (सकाळी 09:10 पर्यंत) त्यानंतर भाव करण
  • चंद्र राशी : सिंह राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 03:54 ते सायंकाळी 05:33 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:10 ते दुपारी 01:03
  • सूर्योदय : सकाळी 06:01
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:12
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
  • जागतिक सायकल दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1818 : शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले, नंतर इंग्रजानी शनिवार वाड्यावर कब्जा करून तिथे युनियन जॅक फडकावला.
  • 1889 : ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
  • 1916 : महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
  • 1940 : डंकर्कची लढाई – जर्मन विजय. दोस्त फौज पळाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाने पॅरिसवर बॉम्ब टाकला.
  • 1947 : हिंदुस्थानच्या फाळणीसाठी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली.
  • 1950 : मॉरिस हर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी 8091 मीटर अन्नपूर्णा शिखरावर पहिले यशस्वी चढाई केली.
  • 1979 : मेक्सिकोच्या आखातातील एहटॉक तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात सांडले.
  • 1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
  • 1989 : चीनने थियानमन स्क्वेअरवर सात आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवले.
  • 1998 : जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1865 : ‘जॉर्ज (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1936)
  • 1890 : ‘बाबूराव पेंटर’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1954)
  • 1890 : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी – यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1988)
  • 1892 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका तसेच बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1986)
  • 1895 : ‘के.एम. पण्णीक्कर’ – चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत यांचा जन्म. (मृत्यू: 10 डिसेंबर 1963)
  • 1924 : ‘एम. करुणानिधी’ – तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1930 : ‘जॉर्ज फर्नांडिस’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘वासिम अक्रम’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1657 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1578)
  • 1932 : ‘सर दोराबजी टाटा’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1859)
  • 1956 : ‘वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1881)
  • 1974 : ‘कृष्ण बल्लभ सहाय’ – बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म:31 डिसेंबर 1898)
  • 1989 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1902)
  • 1990 : ‘रॉबर्ट नोयिस’ – इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1927)
  • 1997 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
  • 1977 : ‘आर्चिबाल्ड विवियन हिल’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2010 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1959)
  • 2011 : ‘भजन लाल बिश्नोई’ – भारतीय राजकारणी, हरियाणाचे सहावे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1930)
  • 2013 : ‘अतुल चिटणीस’ – जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1962)
  • 2013 : नफिसा खान उर्फ ‘जिया खान’ – बॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन.
  • 2014: ‘गोपीनाथ मुंडे’ – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1949)
  • 2016 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन बॉक्सर यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1942)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्सप्रेस गाडीच्या संरचनेत बदल करण्यात आला असल्याची माहीत कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेन क्रमांक १६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेसच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही गाडी सध्या २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डब्यांसहित धावत आहे. मात्र या गाडीचा एक स्लीपर डबा कमी करून त्या जागी २ टियर एसी श्रेणीचा एक डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना खालील प्रमाणे असेल
२ टियर एसी – ०२ , ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित संरचनेसह धावणार आहे.

०२ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • वार : सोमवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : सप्तमी तिथी (रात्री 08:34 पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
  • नक्षत्र : मघा नक्षत्र (रात्री 10:55 पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
  • योग : व्याघात योग (सकाळी 08:19 पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
  • करण : गराजा करण (सकाळी 08:11 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
  • चंद्र राशी : सिंह राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : सकाळी 07:40 ते सकाळी 09:19 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:10 ते दुपारी 01:03
  • सूर्योदय : सकाळी 06:01
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:12
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • 1800 : कॅनडामध्ये जगातील पहिली कांजिण्याची लस दिली गेली.
  • 1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांना रेडिओसाठी पेटंट देण्यात आले.
  • 1897 : मार्क ट्वेन यांनी वृत्तपत्रात त्यांचे मृत्युलेख वाचून म्हटले, “माझे मृत्युलेख अतिशयोक्ती आहे.”
  • 1946 : इटलीने राजेशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले, राजा उम्बर्टो II याला पदच्युत केले. 1949 : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
  • 1953 : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
  • 1979 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
  • 1999 : भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झाले.
  • 2000 : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारने अकरा लाख रुपयांचा सहस्राब्दी कवयित्री पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2003 : युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाले.2014 : तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.
  • 2022 : विनंतीनंतर, युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचे नाव पूर्वी “तुर्की” वरून “तुर्किये” असे बदलले.
  • 2023 : पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ दोन प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1,200 हून अधिक लोक जखमी झाले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1731 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1802)
  • 1840 : ‘थॉमस हार्डी’ – इंग्लिश लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1928)
  • 1907 : ‘विष्णू विनायक बोकील’ – मराठी नाटककार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1930 : ‘पीट कॉनराड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
  • 1943 : ‘इलय्या राजा’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1955 : ‘नंदन निलेकणी’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1955 : ‘मणिरत्नम’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1963 : ‘आनंद अभ्यंकर’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2012)
  • 1965 : ‘मार्क वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1965 : ‘स्टीव्ह वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1974 : ‘गाटा काम्स्की’ – अमेरिकन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
  • 1987 : ‘सोनाक्षी सिन्हा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1989 : ‘ललिता बाबर’ – भारतीय महिला धावपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1882 : ‘ज्युसेप्पे गॅरिबाल्डी’ – इटलीचा क्रांतिकारी यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1807)
  • 1975 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1885)
  • 1988 : ‘राज कपूर’ – भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1924)
  • 1990 : ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1908)
  • 1992 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1934)
  • 2014 : ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1924)

 


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search