Author Archives: Kokanai Digital
Cyclone Alert |अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने देशाच्या किनारपट्टीसह इतर भागातही धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे.
ताज्या माहितीनुसार हा कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून 920km किमी अंतरावर दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात असून उत्त्तर दिशेने सरकत आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात तसेच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील काही भागात चक्रिवादळाची शक्यता आहे.
मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.
Depression has formed over southeast Arabian Sea and lay centered at 0530 IST near Lat 11.3 and Lon 66.0 about 920km WSW of Goa, 1120km SSW of Mumbai. Likely to move nearly northwards and intensify into a CS during next 24 hours. pic.twitter.com/GDEGgwtrcT
— India Meteorological Department (@Indiametdept) June 6, 2023
National Bulletin No 1: दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात Depression.
~1120km दक्षिण-द/पश्चिम मुंबई पासून
920km पश्चिम-द/प. गोवा
1160km दक्षिण पोरबंदर & 1520km द. कराचीपुढच्या 24 तासात उत्त्तर दिशेने सरकणार,🌀चक्रिवादळाची शक्यता,पुर्वमध्य अरबी समुद्रात व दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात
IMD pic.twitter.com/GZC3a2HB3e— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
सिंधुदुर्ग | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण.
सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी.
सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण.
दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ.
दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण.
दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं.
4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
CSMT-Madgaon Special Train | कोकणरेल्वे मार्गावर शुक्रवारी दिनांक ०९ जून २०२३ रोजी एक वन वे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
Train No. 01149 Mumbai CSMT – Madagon Jn. One Way Special:
ही गाडी सकाळी 5:30 वाजता सीएसएमटी या स्थानकावरून सुटून मडगाव या स्थानकावर संध्याकाळी 17:20 वाजता पोहोचणार आहे.
या गाडीचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी रोड आणि करमाळी
डब्यांची संरचना
या गाडीच्या डब्यांची संरचना जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे असणार आहे. विस्टाडोम – 01+ एसी चेअर कार – 03 + सेकंड सीटिंग – 10 + एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 16 एलएचबी डब्यांसहित ही गाडी चालविण्यात येणार आहे.
Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले आणि सुमार काम याविरोधात विविध उपक्रमातून आवाज उठवणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने जनजागृती करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत मुंबई गोवा महामार्गावर महामार्गाच्या रखडलेल्या कामा विरोधात जनजागृती करणारे घोषणा फलक लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावले गेले आहेत.
”पळस्पे ते महाड महामार्गाच्या दुतर्फी ५० बॅनर लावण्यात येत आहेत.झोपेचा सोंग घेऊन झोपलेल्याना आमच्या कोकणकरांच्या समस्या कळाव्यात व जास्तीत जास्त कोकणकर या आंदोलनात जोडले जावेत व स्थानिक जनतेपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वाना विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील बॅनर आपल्या विभागात फोटोसहित लावले तर एक सहकार्य मिळेल.” असे समितीचे सचिव रुपेश दर्गे म्हणाले आहेत.
या अभियानाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असून जनजागृती होवून अधिक चांगला परिणाम मिळणार आहे त्यामुळे दुसर्या टप्प्यात या अभियानाचे मुंबईत ठाणे व नवी मुंबई पालघर जिल्हा येथे ही नियोजन करण्याचे समितीने ठरवले आहे. जे प्रतिनिधी स्व-योगदानाने हे बॅनर आपल्या परिसरांत लावु इच्छित असतील त्यांना आपले नाव व फोटोसकट आपल्या घोषणाफलक लावु शकतात. त्यासाठी 8652505542 संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई |दि.३०.०५.२०२३ रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, नारायण देसाई फाऊंडेशन व मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले होते. या महोत्सवमध्ये बहुभाषिक लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी काही निवडक लघुपट प्रेक्षकांसाठी दाखविण्यात आले. या विनामूल्य लघुचित्रपट पाहण्याचा आनंद असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी घेतला. संपूर्ण थिएटर खचाखच भरले होते. महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह देवून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक संतोष रोकडे सर, सुप्रसि्दध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर, दिग्दर्शक आरयन देसाई, शिरीष राणे, दिलीप दळवी, सर्वणकर, सांडवे,इ. मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चे संचालक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई संतोष रोकडे सरांनी शासकीय योजना तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या उपक्रमांची माहिती दिली. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी चित्रपट आणि लघुपट ई. विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
महोत्सवाचे आयोजक, दिग्दर्शक आरयन देसाई यांनी सर्व मान्यवर व मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या उपस्थितीत नविन उपक्रम म्हणजेच मराठी चित्रपटांचा गौरव सोहळा “मातृभाषा चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा” सुरू करण्याचे जाहीर केले. सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
कोरोमंडल एक्सप्रेस ही रेल्वे कोलकाता येथील हावडा स्थानकावरून चेन्नईला जात असताना ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरुन घसरले. यामध्ये तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra SSC Result 2023 l 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर. निकालाची एकूण टक्केवारी 93.86 टक्के. निकालामध्ये कोकण विभागानं मारली बाजी. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची बोर्डाची माहिती. निकालांमध्ये मुलींनी मारली बाजी.
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
औरंगाबाद: 93.23 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
लातूर: 92.67 टक्के
कोकण: 98.11 टक्के
कोकण विभाग 98.11 टक्के
नागपूर विभाग 92.05 टक्के
राज्याचा निकाल 93.83 %
सिंधुदुर्ग | वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबा मिळाला नसल्याने कुडाळवासिय प्रवासी नाराज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एका स्थानकावर थांबा मिळणार हे निश्चित झाल्यापासून ते स्थानक कोणते असणार याबाबत प्रवाशांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
साहजिकच तो थांबा या जिल्हय़ात मध्यवर्ती भागातील कुडाळ या स्थानकावर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या गाडीला अखेर कणकवली या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते.
कुडाळवासियांची नाराजी दूर करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा का देण्यात आला याचे स्पष्टीकरण माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून काल केले आहे. त्यांच्या मते ”मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.”
माझे काही सहकारी वंदे भारत ट्रेन जी ३ जून पासून कोकणात धावणार आहे त्या ट्रेनला कुडाळ स्टेशनसाठी थांबा मिळाला नाही याबद्दल निराश झाले पण आपल्याला मी सांगू इच्छितो मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 1, 2023
त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही मोजक्या खालीलप्रमाणे…
मागील २ टर्म कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार/खासदार निवडून आले आहेत. याचा राग मनात ठेवून राणे परिवाराने कुडाळला डावलले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
येथील आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ स्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून अपग्रेडेशनचे काम झाले नसल्याने थांबा मिळाला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे.
सावंतवाडी स्थानकावर सर्व अपग्रेडेशन झाले आहे, एवढेच नव्हे तर या स्थानकाला टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. असे असूनही सावंतवाडी स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा का देण्यात आला नाही असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.






















