Author Archives: Kokanai Digital

१३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 27:59:20 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 10:39:08 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:29:03 पर्यंत, भाव – 27:59:20 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 28:38:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:18
  • चन्द्र-राशि-मिथुन – 28:20:36 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:47:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
  • १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.
  • १९१०: न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक रेडीओ च्या माध्यमातून प्रसारण.
  • १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
  • १९४८: १२ जानेवारीच्या संध्याकाळी महात्मा गांधींनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी उपोषणाला बसण्याचे घोषित केले आणि आजच्या दिवशी ते उपोषणाला बसले.
  • १९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
  • १९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
  • १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
  • १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
  • १९७८: अमेरिकेने पहिल्यांदा महिला अंतरिक्षयात्री निवडली.
  • १९९६: पुणे – मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.
  • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नॅशनल कांफ्रेंस चे अध्यक्ष बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १९१९: एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ – १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६) (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)
  • १९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९)
  • १९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
  • १९४९: राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
  • १९७८: भारतीय अभिनेता अस्मित पटेल यांचा जन्म.
  • १९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू
  • १९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)
  • १९७६: अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: ? ? १८९२?)
  • १९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९१५)
  • १९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२)
  • १९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ’शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत. (जन्म: ? ? ????)
  • २०११: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च १९३१)
  • २०१३: रुसी सुरती – क्रिकेटपटू (जन्म: २५ मे १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी सुधारित संरेखनासह अर्ज दाखल

   Follow us on        

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शक्तीपीठे, काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणारा नागपूर आणि गोवा दरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला, स्थानिक शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने कोल्हापुरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, एमएसआरडीसीने प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी घेण्याची योजना मागे घेतली होती.मात्र MSRDC ने आता पुन्हा अर्ज केला आहे. या सुधारित अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व पॅकेजेससाठी काही संरेखन पर्याय सादर केले आहेत.

प्रस्तावित सहा-लेन प्रवेश-नियंत्रित शक्तीपीठ एक्सप्रेसवे लांबीमध्ये नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गापेक्षा लांबीला (802 किलोमीटर) मोठा असणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून जाण्याचा प्रस्ताव आहे. एक्स्प्रेस वेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत होता.

या विरोधामुळे प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त संरेखन पर्याय सादर करण्यात आलेले आहेत. हे पर्याय ठरविताना हा मार्ग सुपीक जमिनी नाश करणारा नसेल आणि पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवणारा नसेल याची दक्षता यावेळी घेतली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

“…अन्यथा प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी स्थानकावर रेल रोको आंदोलन…” कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी:  भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर रेल रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
याबाबतची नोटीस प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानक स्टेशनमास्तर यांना देण्यात आली.या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, सावंतवाडी रोड स्थानकावर प्रस्तावित टर्मिनस चे भूमिपूजन दिनांक २०/०६/२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, मा. पालकमंत्री श्री दिपक केसरकर, मा. खासदार श्री विनायक राऊत, लोकप्रतिनिधी, व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेले आहे. तसेच या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले आहे, असे असताना या स्थानकाच्या नामकरणाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. याचबरोबर २६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेतर्फे सावंतवाडी स्थानकावर लाक्षणिक उपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यावर देखील आपणाकडून आलेल्या पत्रात असंख्य चुका करण्यात आल्या होत्या. आपण अजूनही सावंतवाडी येथील टर्मिनसच्या कामावर आणि येथील प्रवासी सुविधांवर गंभीर नाहीत हेच यावरून निदर्शनास येते.
     
तसेचं कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी येथील टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी टर्मिनस च्या नामकरण संदर्भात आपला प्रस्ताव संबंधित प्रशासनाला पाठवावा. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करण्यासाठी पुन्हा एकदा योग्य तो पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे करावा. सावंतवाडी स्थानकात खालील रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. सावंतवाडी स्थानकावरून कल्याण पुणे मार्गावर नवीन ट्रेन चालू करणे. सावंतवाडी ते बेळगाव ह्या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरु करणे. या मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी एकञ येऊन रेल रोको करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Konkan Railway: खेड स्थानकावरील ‘अत्याधुनिक एक्झिक्युटिव्ह लाउंज’ चे उद्घाटन; ‘लाउंज’ मध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

   Follow us on        
Konkan Railway: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील  खेड रेल्वे स्थानकावर बनविण्यात आलेल्या  ‘अत्याधुनिक एक्झिक्युटिव्ह लाउंज’ चे उद्घाटन कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले. यावेळी कोंकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवथापक  शैलेश बापट आणि केआरसीएलचे इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव रेल्वे स्थानकावर अशी सुविधा देणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज सुरु करण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र क्षेत्रातील अशा प्रकारचे हे पहिले लाउंज ठरले आहे. वातानुकूलित आणि विविध सुविधा असलेले हे लाउंज आरामदायक असेल आणि प्रवाशांना खूप सोयीचे पडेल अशा विश्वास यावेळी संतोष कुमार झा यांनी केला.
एक्झिक्युटिव्ह लाउंज मध्ये कोणत्या सुविधा मिळतात? 
देशाच्या विमानतळावर असलेल्या आरामदायक एक्झिक्युटिव्ह लाउंजच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायक सोयी सुविधा देण्यासाठी असे लाउंज आता भारतीय रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकावर बनविण्यात येत आहेत. प्रति तासासाठी काही ठराविक रक्कम देऊन लाउंज मध्ये प्रवाशांना थांबता येते. अशा प्रकारच्या लाउंज मध्ये कमी अधिक फरकाने  खालील सुविधा मिळतात
१. दोन तासांचा मुक्काम
२. वाय-फाय
३. शीतपेये (चहा, कॉफी, शीतपेये)
४. वर्तमानपत्र आणि मासिके वाचन
५. ट्रेन माहिती प्रदर्शन आणि घोषणा
६. टीव्ही
७. शौचालये आणि मूत्रालये
८. शू शायनर
९. पूर्णपणे एसी बसण्याची जागा

१२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 29:05:45 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 11:25:39 पर्यंत
  • करण-गर – 17:48:30 पर्यंत, वणिज – 29:05:45 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 09:09:12 पर्यंत, इंद्रा – 30:44:14 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:18
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 16:45:00
  • चंद्रास्त- 30:42:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय युवा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
  • १७०८: मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू संभाजी भोसले महाराजांचा राज्याभिषेक केल्या गेल्या.
  • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
  • १९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
  • १९३१: प्रसिद्ध पाकिस्तानी कवी अहमद फ़राज़ यांचा जन्म.
  • १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
  • १९३६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा जन्म.
  • १९४९: माजी संसद चे सदस्य पारसनाथ यादव यांचा जन्म.
  • १९६४: राजनीतिज्ञ अजय माकन यांचा जन्म.
  • १९६४: उत्तर प्रदेश चे माजी उपमुख्यमंत्री तसेच राजनीतिज्ञ दिनेश शर्मा यांचा जन्म.
  • १९७२: कॉंग्रेस च्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा जन्म.
  • १९८४: स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी या दिवशी “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
  • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
  • २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
  • २००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
  • २००७: “रंग दे बसंती” या चित्रपटाला ब्रिटिश अॅकेडमी फिल्म पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
  • २००९: जगप्रसिद्ध ए. आर. रेहमान हे गोल्डन ग्लोब अवार्ड मिळणारे पहिले भारतीय ठरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५९८: राजमाता जिजाबाई (मृत्यू: १७ जून १६७४)
  • १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
  • १८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (मृत्यू: ४ जुलै १९०२)
  • १८६९: भारतरत्न पुरस्काराने सन्मानित शास्त्री भगवान दास यांचा जन्म.
  • १८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
  • १८९९: पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)
  • १९०२: महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (मृत्यू: १३ जुलै १९६९)
  • १९०६: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
  • १९१७: महर्षी महेश योगी (मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
  • १९१८: सी. रामचंद्र – संगीतकार (मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९७: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (जन्म: ४ जानेवारी १८१३)
  • १९२४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपीनाथ साहा यांचे निधन.
  • १९३४: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सूर्य सेन यांचे निधन.
  • १९४४: वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)
  • १९६६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: १० जानेवारी १८९६)
  • १९७६: अ‍ॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्‍या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
  • १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’ (जन्म: ८ एप्रिल १९२४)
  • १९९७: ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ’तलाश’, ’ फूल और पत्थर’, ’हलचल’, ’पापी, ’शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: ? ? १९२५)
  • २००५: अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (जन्म: २२ जून १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

मुंबई गोवा महामार्गावर हातखंब्यानजीक कार आणि ट्रेलरचा अपघात; कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रत्नागिरी : गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला.

अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक जीजे 27 टिएफ 6818 हा गोव्याहून नवी मुंबईकडे चाललला होता. त्याला मागून येत असलेल्या कार एमएच 01 एएक्स 9281 ने जोराची धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघतस्थळी लोकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली.

११ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 08:24:11 पर्यंत, त्रयोदशी – 30:36:26 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 12:30:26 पर्यंत
  • करण-बालव – 08:24:11 पर्यंत, कौलव – 19:28:37 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 11:48:22 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:17
  • चन्द्र-राशि-वृषभ – 23:56:13 पर्यंत
  • चंद्रोदय- 15:43:59
  • चंद्रास्त- 29:42:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताहाला सुरुवात.
महत्त्वाच्या घटना:
  • १६१३: मुघल सम्राट जहागीर ने पहिल्यांदा इस्ट इंडिया कंपनी ला सुरत येथे कारखाना उभारण्यास परवानगी दिली.
  • १७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
  • १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
  • १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
  • १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • १९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
  • २०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००९: स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१)
  • १८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
  • १८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५)
  • १८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
  • १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
  • १९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
  • १९५४: बाल मजुरांच्या विरुद्ध आवाज उचलणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा जन्म.
  • १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
  • १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
  • १९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
  • १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
  • १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
  • १९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
  • १९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
  • १९६२: भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेता अजय घोष यांचे निधन.
  • १९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
  • १९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
  • १९९०: भारतीय संगीतकार राम चतुर मलिक यांचे निधन.
  • १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
  • २००८: य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
  • २००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

महत्वाचे: १२ वीची हॉल तिकीटे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध

   Follow us on        

HSC exam hall tickets: बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.

यासोबतच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या  www.mahahsscboard.in ‘ या संकेतस्थळावरून आज पासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटे आजपासून उपलब्ध देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन हॉल तिकिटे मिळविण्यास काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत अशी माहिती सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

 

Konkan Railway: ‘शेकोटी’ मुळे कोकणरेल्वे रखडली

   Follow us on        
Konkan Railway: पहाटेच्यावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकाजवळ काहीजणांनी शेकोटी पेटविली होती. त्या शेकोटीची धग रेल्वेची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या केबलला लागून संपूर्ण केबल जळाल्याने गोव्यातून बाहेरच्या राज्यांना संपर्कासाठी वापरली जाणारी यंत्रणा तब्बल चार तास कोलमडली.
यात रेल्वेच्या संदेशवहन प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण रेल्वे स्थानकाच्या आवाराबाहेर हा प्रकार घडला. या भागात रेल्वे स्थानकावर काम करणारे काही हमाल राहतात. याच हमालाच्या एका ग्रुपने ही शेकोटी पेटविली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्ग तसेच दक्षिण-पश्चिम रेल्वे मार्गावरील कित्येक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवल्या. शेवटी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे कवच देऊन या रेलगाड्या हळूहळू मार्गस्थ केल्या.
यासंदर्भात कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली. मात्र, त्यामुळे काही रेल्वे उशिरा धावल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कुणाच्याही विरोधात तक्रार नोंदविलेली नाही, असे सांगण्यात आले.

१० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 10:22:17 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 13:46:36 पर्यंत
  • करण-विष्टि – 10:22:17 पर्यंत, भाव – 21:22:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 14:36:35 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:16
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 14:48:00
  • चंद्रास्त- 28:38:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक हिंदी दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६६६: सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
  • १७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
  • १८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
  • १८१०: नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.
  • १८३९: पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
  • १८६३: चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
  • १८७०: जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
  • १८७०: बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
  • १८८४: ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
  • १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
  • १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
  • १९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
  • १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
  • १९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
  • २००६: माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
  • २००८: टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
  • १८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
  • १९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
  • १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म (मृत्यू: ? ? ????)
  • १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
  • १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
  • १९३७: भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
  • १९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
  • १९४९: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
  • १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
  • १९७१: प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
  • १९७४: हृतिक रोशन – सिनेकलाकार
  • १९८४: भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६९३: कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
  • १७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: ? ? १७२३)
  • १७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले. (जन्म: २३ मे १७०७)
  • १९६९: उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
  • १९९४: ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
  • १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
  • २००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search