




Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असताना तसेच अनेक भागात काम सुमार झाले असताना शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्यावरून ह्या महामार्गावरील वाहतुकीसाठी टोल वसुली सुरू होणार आहे असे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला आहे.
हेही वाचा : जनआक्रोश सभा ! 2023 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण नाही झाले तर…..
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जूनपासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या. यात टोल वसुली करणाऱ्या कंपन्या निश्चित झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून महामार्गावरील वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे.
हेही वाचा : पर्यटनाचा हंगाम…कोंकणरेल्वे मार्गावरील ८ गाड्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार
महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.

Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.
तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf
Block "ad1" not found


Block "ad1" not found


Ratnagiri News :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. गेली पाच वर्षे राखलेल्या ह्या कामाच्या भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ह्या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. ह्या कामासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
हेही वाचा : ‘जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती’ची येत्या रविवारी सभा.
या गावांतून जाणार महामार्ग…
शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळेवडे, केर्ले, चांदोली, चनवाड, वारूळ, वालूर, निळे, करुंगळे, येलूर, जाधववाडी, कडवे, पेरिड, भैरेवाडी, कोपार्डे, ससेगाव, करंजोशी, सावे, गोगवे, बांबवडे, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी; पन्हाळा तालुक्यातील आवळी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, अंबवडे, पिंपळे-सुर्वे, दानेवाडी, कुशिरे; करवीर तालुक्यातील केर्ले, पडवळवाडी, केर्ली, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये; तर हातकणंगले तालुक्यातील टोप, नागाव, वडगाव, हेर्ले, माले आणि चोकाक.


हेही वाचा : कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….
खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार आहेत.
अ. क्र. ट्रेनचे नाव
अतिरिक्त डबे दिनांक कोकणातील थांबे
3 19260 Bhavnagar - Kochuveli Express One Sleeper Coach On 29/11/2022 Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
4 19259 Kochuveli - Bhavnagar Express One Sleeper Coach On 01/12/2022 Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
7 22908 Hapa - Madgaon Jn. Express One Sleeper Coach From 30/11/2022 to 28/12/2022 Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
1 20924 Gandhidham - Tirunelveli Express One Sleeper Coach From 28/11/2022 to 26/12/2022 Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
6 19577 Tirunelveli - Jamnagar Express One Sleeper Coach From 05/12/2022 to 27/12/2022 Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
8 22907 Madgaon Jn. - Hapa Express One Sleeper Coach From 02/12/2022 to 30/12/2022 Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
5 19578 Jamnagar - Tirunelveli Express One Sleeper Coach From 02/12/2022 to 24/12/2022 Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
2 20923 Tirunelveli - Gandhidham Express One Sleeper Coach From 01/12/2022 to 29/12/2022 Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
हेही वाचा : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…
मुंबई :दादर रेल्वे स्थानका फलाट क्रमांक-४ आणि ५ क्रमांक फलाटाला दुहेरी जोडणी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. फलाट क्रमांक-४ आणि ५ यांच्यामध्ये फलाट क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने ह्या हालचाली सुरू केल्या आहेत.

स्थानकातील फलाट क्रमांक-३वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबतात. फलाट ४ आणि ५ यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. ते हटवून लोकल पकडण्यासाठी फलाट ५चा देखील पर्याय खुला करून देण्याचे काम सुरू आहे. सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास फलाट क्रमांक ‘४ ए’ या नव्या फलाटावरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फलाट ५वरून अगदी मोजक्याच मेल-एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांच्या वेळा वगळता अन्य वेळेत या फलाटावर शुकशुकाट असतो. आपत्कालीन स्थितीत या फलाटावर लोकल वाहतूक होते. यालगत असलेल्या फलाट-४वर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मुख्य पुलाच्या आणि स्वामी नारायण मंदिरदिशेकडे उतरणाऱ्या पुलांच्या पायऱ्यांची जोडणी फलाट ५वर आहे. फलाटावर ठाण्याच्या दिशेला लिफ्ट आणि बंद अवस्थेत रेल्वे कार्यालय आहे. कार्यालय आणि लिफ्टची नव्या ठिकाणी उभारणी आणि पुलांच्या पायऱ्या ही प्रमुख आव्हाने रेल्वे प्रशासनासमोर आहेत. संबंधित तज्ज्ञ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फलाट ४वरील स्टॉल, अकार्यान्वित पाणी देणारे मशिन आणि प्रवासी वर्दळीसाठी अडथळे असणारी अन्य बांधकामे हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे फलाट ३ आणि ४वर अधिक जागा उपलब्ध होणार आहे. मार्च २०२३अखेर हे काम पूर्ण होणार आहे.
Block "ad1" not found

मुंबई :देशाच्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कोकण प्रदेशाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण भारत देशाचे दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी कोकणात म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. , सरखेल कानोजी आंग्रे ,नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती नेताजी पालकर, महान सेनानी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके , मातृशक्तीचे देशातील सर्वात मोठे प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतरत्न विनोबा भावे ,भारतरत्न महर्षी कर्वे अशी अनेक नररत्न या देशाला कोकण प्रदेशाने दिली. या महान व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रपुरुषांना मानवंदनादेण्यासाठी भव्य स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आणि अभियान कोकण बिझनेस फोरम व मी मुंबई तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
हेही वाचा : पर्यटन संचालनालयामार्फत महाड येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क सहलीचे आयोजन
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणिउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष सहकार्य या अभियानाला मिळणार आहे. कोकणचे सुपुत्र मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे या अभियानाचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेतील मा. प्रवीण दरेकर याचे संयोजक आहेत.यावेळी भव्य उद्योग प्रदर्शन , सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे
कोकणातील इतिहास संस्कृती परंपरा लोककला उद्योग यांचा भव्य महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. देशाचे उद्योग मंत्री नारायणराव राणे आणि त्यांचे एमएसएमई मंत्रालय या उपक्रमाला विशेष सहकार्य करत आहेत. राज्याच्या उद्योग मंत्री उदय जी सामंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर कोकण अंतर्गत कोकणातील तरुणांना कोकणात उद्योग उभारण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समन्वय याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी भव्य परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आमदार प्रसादजी लाड यांनी पुढाकार घेतला आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडेवरेकर यांची संपूर्ण टीम या उपक्रमात सहभागी झाली आहे.
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा
कालावधी :६ ते ९ डिसेंबर
स्थळ : नेस्को कॉम्प्लेक्स ,वेस्टन एक्सप्रेस हायवे गोरेगाव
कार्यक्रमपत्रिका
६ डिसेंबर
सकाळी ८-३०. भव्य उद्घाटन
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब, महोत्सव प्रमुख, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब
संध्याकाळी ४ ते ६
स्वराज्यभूमी मंथन परिषद
प्रमुख अतिथी रघुजीराजे आंग्रे , सरखेल कान्होजी आंग्रे यांची वंशज. व अन्य प्रमुख व्यक्तिमत्वांचे वंशज
संध्याकाळी ६ ते ९
आंबा काजू उद्योग परिषद
प्रमुख अतिथी. माननीय गिरीशजी महाजन, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र
सचिव, / व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
दिनांक ७ डिसेंबर
सकाळी ११ ते दुपारी ४
कोकण मत्स्य उद्योग परिषद आणि निसर्ग संवर्धन परिषद
प्रमुख उपस्थिती वन आणि मत्स्य उद्योग मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब , सचिव- मत्स्य उद्योग विभाग / सचिव -वनविभाग
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभूमी सागरी परिषद
प्रमुख अतिथी. माननीय दादाजी भुसे बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन
सचिव बंदर विकास, सी ई ओ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
गुरुवार दिनांक 8 डिसेंबर
सकाळी दहा ते दुपारी चार
स्वराज्य भूमी कोकण पायाभूत सुविधा व उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र जी चव्हाण साहेब.
एम एम आर डी ए , सिडको , एमएसआरडीसी ,कोकण रेल्वे विविध विभागाचे प्रमुख.
एम एस एम इ , खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्योग संचालनालय विविध उद्योग विकासाच्या योजना आणि त्या विभागाचे प्रमुख.
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभुमी सीएसआर परिषद
कोकणातील मोठे उद्योग समूह आणि कोकणातील मोठ्या सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे स्नेहसंमेलन.
प्रमुख उपस्थिती
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब
शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर
स्वराज्यभूमी पर्यटन उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती मा. मंगल प्रभात लोढा साहेब, पर्यटन मंत्री, सचिव पर्यटन विभागसं, चालक पर्यटन संचनालय
संध्याकाळी सहा वाजता भव्य समारोप
प्रमुख उपस्थिती महोत्सव प्रमुख आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री मा नारायणराव राणे साहेब
निमंत्रक /शब्दांकन : माननीय संजय यादवराव, संयोजक आणि समन्वयक
सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म
https://docs.google.com/forms/d/17d47nRRv-3egyy80ZhYMH1dtl-_eFuvzwKxfqWa36rM/edit


Block "ad1" not found

Content Protected! Please Share it instead.