Author Archives: Kokanai Digital

गणेशभक्तांना खुशखबर: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची घोषणा; यादी येथे वाचा

   Follow us on        

Special Train for Ganesh Chaturthi: कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई- रत्नागिरी, मुंबई-कुडाळ, मुंबई – सावंतवाडी तसेच दिवा – चिपळूण या विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे च्या आरक्षण खिडक्यांवर तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.

१) मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी  येथे पोहोचेल.

०११५२  स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

२) मुंबई सीएसएमटी -रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

०११५३ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३:३०  वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

३) एलटीटी -कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी  ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

४) एलटीटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११७१ स्पेशल एलटीटी  मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी  येथे पोहोचेल.

०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २२:२०  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  सकाळी १०:४० वाजता एलटीटी  मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

5) दिवा- चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी

रचना: १२ मेमू डबे

 

6) एलटीटी -कुडाळ  स्पेशल (१६सेवा)-

०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

७) एलटीटी -कुडाळ स्पेशल (६सेवा)-

०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

डब्यांची रचना: १२ थ्री टायर एसी , ०५ टू टायर एसी, १ फर्स्ट एसी, १ पॅन्ट्रीकार, २ ब्रेक वॅन असे मिळून एकूण २० डबे

 

Loading

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

Loading

महत्वाचे: मुंबई गोवा महामार्गावर आजपासून २ दिवसांचा मेगाब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Goa Highway mega block : मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या महामार्गावर पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला आहे. यासाठी पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधित प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे अवाहन  प्रशासनाने केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुढील दोन दिवस चार तास बंद राहणार आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं गेलं होतं. मात्र आता या कामाने वेग घेतला आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी बारा ते चार या वेळेत एकूण चार तास बंद राहणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावर याआधी १३ ते १५ जुलैपर्यत तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या महामार्गावरील पुईं येथील म्हैसदरा पुलाच्या कामासाठी आजपासून वाहतूक ही दिवसातून चार तास बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं गेलं आहे.
पर्यायी मार्ग कोणते? 
मुंबईहून कोकणाकडे पाली माणगावमार्ग जावे लागणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत पर्यायी वाहतुकीसाठी कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव-निजामपूर-पाली-खोपोली, रोहा नागोठाणे असा प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईकडून गोव्याकडे यायचं झाल्यास वाकन पाली-निजामपूर-माणगावमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

Loading

१८ जुलै दिनविशेष – 18 July in History

जागतिक दिवस:
  • World Listening Day
  • Nelson Mandela International Day
महत्त्वाच्या घटना:
  • ६४ई.पुर्व: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले फिडल (तुणतुणे) वाजवत असल्याची कथा प्रसिद्ध आहे.
  • १८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
  • १८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना
  • १८७२: ब्रिटन मध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिनियम लागू करण्यात आला. यापूर्वी खुल्या प्रकारे मतदान केलं जात असे.
  • १९१४: महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले.
  • १९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
  • १९६८: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना
  • १९७६: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९८०: भारताने ’एस. एल. व्ही. – ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.
  • १९९६: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
  • १९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६३५: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)
  • १८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)
  • १८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)
  • १९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)
  • १९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)
  • १९१८: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)
  • १९२७: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२)
  • १९३५: जयेन्द्र सरस्वती – ६९ वे शंकराचार्य
  • १९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
  • १९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
  • १९७२: सौंदर्या – कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४)
  • १९८२: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)
  • १८९२: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
  • १९६९: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
  • १९८९: डॉ. गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: ? ? ????)
  • १९९४: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २००१: पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन – सांगलीच्या राजमाता (जन्म: ? ? ????)
  • २००१: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४)
  • २०१२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि लोकसभा सदस्य (जन्म: २९ डिसेंबर १९४२)
  • २०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
  • २०१७: सुप्रसिद्ध भारतीय कवी, संस्कारकार, कथाकार, उपन्यासकार आणि सहृदय समीक्षक अजित शंकर चौधरी यांचे निधन.

Loading

Mumbai Metro | मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो २४ जुलै पासून सुरू होणार

   Follow us on        

मुंबई, दि. १७ जुलै: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

 
जाहिरात - गणपती मकर- किंमत फक्त ८९९ रुपये

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अर्थात अक्वा लाईन जी कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार आहे. येत्या २४ जुलैपासून या मेट्रोला सुरुवात होत आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण २७ थांबे असणार आहेत. या मेट्रोमुळं उपनगरीय प्रवास तसंच प्रत्यक्ष रस्त्यावरुन धावण्याऐवजी भूमिगत धावणार असल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुकर बनवण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरु होत आहे. ही मेट्रो मुंबई शहराच्या वेगाला नवा वेग देईल.

Loading

Mumbai Goa Highway | अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव; जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये ठराव मंजूर

   Follow us on        
राजापूर: अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या पुलाला राजापूरचे पहिले राज्यमंत्री (कै.) ल. र. तथा भाई हातणकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखेच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याप्रमाणे महामार्गावरील अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये झाला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली आहे.
 
जाहिरात - गणपती मकर- किंमत फक्त ८९९ रुपये
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाची प्रत्यक्ष उभारणी सुरू झाली होती.  मात्र, भूसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळातील शिथिलता यामुळे हा पूल मार्गी लागण्यास मे २०२२ उजाडले हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. अर्धा नदीपात्रात आणि अर्धा जमिनीवर असा हा महामार्गावरील पहिला आणि एकमेव पूल आहे.

Loading

सावंतवाडी: आंबोली घाटरस्त्यात कोसळला भला मोठा दगड; रस्ता खचण्याची शक्यता

सावंतवाडी, दि. १७ जुलै: :  आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना  सकाळी ७ च्या सुमारास घडली. .या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तर भला मोठा दरडीतील दगड थेट घाटमार्गात कोसळल्याने रस्त्याला मोठा खड्डा पडत भेग पडली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे.



वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.

Loading

आंबोली: हुल्लडबाजीच्या सर्व मर्यादा पार, जिल्हा परिषद शाळेतच पर्यटकांची मद्य पार्टी

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्‍याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.





आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.

Loading

१७ जुलै दिनविशेष – 17 July in History

जागतिक दिवस:
  • आंतरराष्ट्रीय न्याय दिन: World Day for International Justice
  • World Emoji Day
महत्त्वाच्या घटना:
  • १४८९: निजाम खान यांची सिकंदर शाह द्वितीय यांच्या नावाने दिल्लीचे सुल्तान म्हणून घोषित करण्यात आलं.
  • १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
  • १८१९: ’अ‍ॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
  • १८४१: अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.
  • १९४७: मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्‍या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.
  • १९५०: देशांतील पहिली विमान दुर्घटना पंजाब राज्यातील पठाणकोट येथे घडून आली.
  • १९५३: अमेरिकन व्यंग चित्रकार व लेखक वॉल्ट डिज़्नी (Walt Disney) यांनी अमेरिकेतील अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी ‘डिस्‍नेलँड’ सुरू केले.
  • १९५५: वॉल्ट डिस्‍ने यांनी अ‍ॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्‍नेलँड’ सुरू केले.
  • १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
  • १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९९३: तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोच्‍च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान
  • १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
  • २०००: अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर
  • २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.






जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८९: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)
  • १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
  • १९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
  • १९१९: स्‍नेहल भाटकर – संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)
  • १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
  • १९३०: बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (मृत्यू: २६ मार्च २००८)
  • १९५४: अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर
  • १९५९: भारतीय हिंदी आणि मल्याळम चित्रपट अभिनेत्री जरीना वहाब यांचा जन्मदिन.
  • १९६९: भारतीय हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता रवी किशन यांचा जन्मदिन






मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९०: अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)
  • १८३५: मेघालय सम्राट तिरोट सिंग यांचे निधन.
  • १९२८: भारताच्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि भारतीय संसदेच्या सदस्या मृणाल गोरे यांचे निधन.
  • १९७२: गुजरात राज्यातील प्रसिद्ध राजकारणी आणि ‘अखिल भारतीय किसान सभे’चे नेते, इंदुलाल याज्ञिक यांचे निधन.
  • १९९२: काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)
  • १९९२: शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)
  • २००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
  • २०१२: मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)
  • २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
  • २०२०: सी.एस. शेषाद्री – भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २९ फेब्रुवारी १९३)





Loading

Konkan Railway | उद्याची जनशताब्दी एक्सप्रेस रद्द; कोचुवेली एक्सप्रेस उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आले नसून बऱ्याच गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार  उद्या दिनांक १७ जुलै रोजीची मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५२) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे तर आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११३  लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्सप्रेस जी संध्याhttps://kokanai.in/wp-admin/edit.phpकाळी १६:४५ वाजता सुटणार होती ती १७ जुलैला ००:५० वाजता म्हणजे आज मध्यरात्री सोडण्यात येणार आहे.
 
जाहिरात - गणपती मकर- किंमत फक्त ८९९ रुपये

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search