Author Archives: Kokanai Digital

सावंतवाडी: आता रेल रोको शिवाय पर्याय शिल्लक नाही..!!  – रेल्वे प्रवासी संघटनेचा एकमुखी निर्धार.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,

आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.

Loading

१६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 12:29:35 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 25:14:10 पर्यंत
  • करण-कौलव – 12:29:35 पर्यंत, तैतुल – 23:39:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 23:21:49 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:02
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 19:00:59
  • चंद्रास्त-07:58:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
  • भारतीय विजय दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
  • १७०७: जपान च्या माउंट फुजी या पर्वतावर या दिवशी शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.
  • १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
  • १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
  • १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
  • १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
  • १९३२: ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • १९४५: जपान चे दोन वेळा राहिलेले प्रधानमंत्री फ्युमिमारो कोनी यांनी आत्महत्या केली होती.
  • १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९५१: हैदराबाद चे सालार जंग संग्रहालयाची स्थापना.
  • १९७१: भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
  • १९८५: कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
  • १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
  • १९९३: दिल्लीला सर्वांसाठी शिक्षण हे चर्चासत्र पार पडले.
  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
  • २००७: बांग्लादेश ने पाकिस्तान पासून मुक्तीचा ३६ वा विजय दिवस साजरा केला होता.
  • २०१४: पाकिस्तान च्या पेशावर येथे दहशदवादी हल्ल्यात १५० लोकांचा जीव गेला होता त्यामध्ये १३४ लहान मुले होती
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)
  • १७७५: जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
  • १८८२: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
  • १९१७: सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
  • १९३७: भारतीय कुश्तीपटू हवा सिंग यांचा जन्म.
  • १९५९: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा जन्म.
  • १९७०: महाराष्ट्राचे लोकसभेचे सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांचा जन्म.
  • १९७७: ध्यानचंद यांचे भाऊ आणि हॉकी चे प्रसिद्ध खेळाडू रूपसिंग यांचे निधन.
  • १९८६: भारतीय गायिका हर्षदीप कौर यांचा जन्म.
  • १९९३: जगातील सगळ्यात लहान उंचीची महिला ज्योती आमगे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६०: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
  • १९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
  • १९८०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
  • २०००: सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
  • २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)२००२: भारतीय अभिनेत्री कव्वाल शकीला बानो यांचे निधन.
  • २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.
  • २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
  • २०१३: भारतीय क्रिकेटर मधुसूदन रेगे यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

“राणेंना संपवता संपवता…..” नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर निलेश राणे यांची ती पोस्ट चर्चेत

   Follow us on        

नागपुर:महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा आजच पार पाडला. अपेक्षेप्रमाणे कणकवली मतदारसंघातील भाजपचे आमदार यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक पोस्ट ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे ती पोस्ट?    

तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…

आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.

जय महाराष्ट्र!

Loading

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? कोकणाला किती मंत्रीपदे? वाचा यादी!

   Follow us on        

Maharashtra Cabinet list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडलाा. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या 20, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली

भाजपचे मंत्री

देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. राधाकृष्ण विखे-पाटील
  3. चंद्रकांत पाटील
  4. गिरीश महाजन
  5. गणेश नाईक
  6. मंगलप्रभात लोढा
  7. जयकुमार रावल
  8. पंकजा मुंडे
  9. अतुल सावे
  10. अशोक उईके
  11. आशिष शेलार
  12. शिवेंद्रराजे भोसले
  13. जयकुमार गोरे
  14. संजय सावकारे
  15. नितेश राणे
  16. आकाश फुंडकर
  17. माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
  18. पंकज भोयर (राज्यमंत्री)
  19. मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)

शिवसेनेचे मंत्री

एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री

  1. गुलाबराव पाटील
  2. दादा भुसे
  3. संजय राठोड
  4. उदय सामंत
  5. शंभूराज देसाई
  6. संजय शिरसाट
  7. प्रताप सरनाईक
  8. भरतशेठ गोगावले
  9. प्रकाश आबिटकर
  10. आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
  11. योगेश कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री

अजित पवार – उपमुख्यमंत्री

  1. हसन मुश्रीफ
  2. धनंजय मुंडे
  3. दत्तात्रय भरणे
  4. आदिती तटकरे
  5. माणिकराव कोकाटे
  6. नरहरी झिरवाळ
  7. मकरंद पाटील
  8. बाबासाहेब पाटील
  9. इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)

कोकणाला ५ मंत्रीपदे
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोकणातील ५ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, आदिती तटकरे, योगेश कदम यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Loading

मालवण: ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती करणारे शिल्पकार उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

   Follow us on        
सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया हा पुतळा कसा असेल.
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावर लवकरच 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे.  विशेष म्हणजे यावेळी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती करणाऱ्या  प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीद्वारे हा पुतळा तयार केला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
याआधी डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं.. मात्र अवघ्या 8 महिन्यात ऑगस्ट 2024 मध्ये हा पुतळा वादळात कोसळला. यानंतर पुतळ्याच्या दर्जावरुन चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना सर्व खबरदारी घेतली जाणाराय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं कंत्राट प्रसिद्ध शिल्पकार राम सुतारांना देण्यात आलंय. हा पुतळा 60 फूट उंच असेल. नवीन पुतळा ब्राँझ धातूचा असले. त्यावर 8 मिमी जाडीचं क्लॅडिंग असेल.  तेव्हा छत्रपतींच्या कीर्तीला साजेल असा भव्या पुतळा भविष्यात राजकोट किल्ल्यावर थाटात उभा दिसेल यात शंका नाही.

Loading

१५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 14:33:29 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 26:20:36 पर्यंत
  • करण-भाव – 14:33:29 पर्यंत, बालव – 25:28:00 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 26:02:49 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:06
  • सूर्यास्त- 18:02
  • चन्द्र-राशि-वृषभ – 15:05:00 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:57:59
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
जागतिक चहा दिन
महत्त्वाच्या घटना:
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९११: बनारस हिन्दू युनिवर्सिटी सोसायटी ची स्थापना केली गेली.
१९१७: युरोप चा देश मॉल्डोवा ने रशिया पासून स्वतःला स्वंतंत्र घोषित केले.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९५३: भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९६१: हिटलर च्या आयोजकांपैकी एक अ‍ॅडॉल्फ आयचमन याला फाशीची सजा दिली गेली.
१९७०: व्हेनेरा – ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
१९९१: चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
१९९२: ला भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित.
१९९७: ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.
१९९८: बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक
२०००: ला चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट जनावर आणि पक्षांना हानिकारक असल्याने कायमचे बंद करण्यात आले.
२००१: इटली चे पिसा टॉवर ११ वर्ष बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले होते.
२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
२००३: भूतान ने त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीय वेगळेवादी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.
२००५: इराक मध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले.
२००८: झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्थावला मंजुरी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
०: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)
६८७: पोप सर्गिअस (पहिला) (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
१८३२: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
१८५२: हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)
१८९२: जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू: ६ जून १९७६)
१९०३: स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१९०५: इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९०५: चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष रघुनाथ केशव खाडिलकर यांचा जन्म.
१९२२: भारताचे माजी क्रिकेटर रुसी कूपर यांचा जन्म.
१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
१९३२: टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)
१९३५: उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
१९७४: भारताच्या प्रसिद्ध व्होकलायझर रसूलन बाई यांचे निधन.
१९७५: भारताचे नौदल सैनिक नवांग कापडिया यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.
१९८१: भारतीय हॉकी खेळाडू भारत छत्री यांचा जन्म.
१९८८: भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७४९: छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)
१८५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)
१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
१९५०: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
१९५२: ला स्वातंत्र्य सैनिक पोट्टि श्रीरामुलु यांचे निधन.
१९६६: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८५: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)
२०००: प्रसिद्ध लेखक तसेच पत्रकार गौर किशोर घोष यांचे निधन.
२०१३: लोकसभेचे सदस्य सीस राम ओला यांचे निधन.
२०१३: इंडिअन आयडल च्या दुसऱ्या सीजन चे विजेते संदीप आचार्य यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्याची संमती

   Follow us on        
बेळगाव: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्य सरकारने पूर्ण संमती दर्शविली आहे आणि या संदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आहे.
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या आणि मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांनी हे सांगितले.
“कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये यापूर्वीच विलीनीकरण व्हायला हवे होते. तथापि, ऑपरेशनल तोट्यामुळे, या प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर कोणताही महत्त्वपूर्ण विकास झालेला नाही. कर्नाटकच्या २७० कोटी रुपयांच्या इक्विटी योगदानाच्या समायोजनाबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. भारतीय रेल्वेमध्ये विलीन झाल्यानंतर, नवीन गाड्या सुरू केल्या जातील आणि विद्यमान रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा दिसून येतील,” असे जॉर्ज यांनी गुरुवारी विधानसभेत आमदार किरण कुमार कोडगी आणि व्ही. सुनील कुमार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला संबोधित करताना सांगितले.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खरगे यांनी जोडले की, राज्य सरकारने विलीनीकरणाबाबत कोकण रेल्वेला आधीच पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.
एकूण चार राज्याची भागीदारी असलेली कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आतापर्यंत दोन राज्यांनी संमती दर्शवली आहे. अलीकडेच गोवा राज्याने कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आपली संमती दर्शवली  आहे.

Loading

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची आज सावंतवाडीत महत्त्वाची बैठक

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Loading

१४ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 17:00:54 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 27:55:16 पर्यंत
  • करण-वणिज – 17:00:54 पर्यंत, विष्टि – 27:44:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 08:26:00 पर्यंत, साघ्य – 29:06:38 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 16:59:00
  • चंद्रास्त- 30:53:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.
  • शहीद बुद्धीजीवी दिन – बांग्लादेश
  • राज्य दिन – अमेरिका-अलाबामा
महत्त्वाच्या घटना:
  • १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
  • १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
  • १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.
  • १९११: रुआल आमुन्सन यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली.
  • १९२१: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एनी बेसेन्ट यांना ‘डॉक्टर ऑफ़ लेटर्स ची पदवी ने सन्मानित केले.
  • १९२९: ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
  • १९५०: UNHCR ची स्थापना.
  • १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९६२ : नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
  • १९८३: हुसैन मोहम्मद इरशाद यांनी स्वतःला बांगलादेश चे राष्ट्रपती घोषित केले.
  • १९९७: ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.
  • १९९८: २३ व्या काहिरा अंतरराष्ट्रीय फ़िल्म समारोह तमिळ चित्रपट “टेररिस्ट” साठी सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी आयशा धारकर यांना जूरी पुरस्कार ने सन्मानित केल्या गेले
  • २०००: जॉर्ज वॉकर बुश हे अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेले.
  • २००२: पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवून दृष्टिहीन चा विश्वचषक जिंकला.
  • २००८: अर्जेंटिना आणि भारतामध्ये खेळल्या गेलेल्या हॉकीच्या अंडर-२१ सामन्यात ४-४ ने सामना रद्द झाला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५०३: नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
  • १५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
  • १८६४: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचा जन्म.
  • १८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
  • १९१०: ला भारतीय कादंबरीकार उपेंद्रनाथ अशक यांचा जन्म.
  • १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
  • १९२२: ला प्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध वैज्ञानिक निकोले बासोव यांचा जन्म.
  • १९२४: राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)
  • १९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
  • १९२८: प्रसाद सावकार – गायक व नट
  • १९३६: ला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता विश्वजीत चटर्जी यांचा जन्म.
  • १९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
  • १९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)
  • १९५३: विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
  • १९६२: ला माजी भारतीय क्रिकेटर भरत अरुण यांचा जन्म.
  • १९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.
  • १९९४: ला भारतीय क्रिकेटर कुलदीप यादव यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
  • १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)
  • १९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
  • १९७१: ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.
  • १९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)
  • १९७९: भारताचे माजी क्रिकेट खेळाडू निरोडे चौधरी यांचे निधन.
  • २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)
  • २००५: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार सुधीर जोशी यांचे निधन.
  • २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांत कपात

   Follow us on        

Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे

१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२

सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१

दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

 

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search