Author Archives: Kokanai Digital

सावंतवाडी: रेल्वेच्या ‘त्या’ फलकाच्या समोरच झळकले निषेधाचे बॅनर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. ११ जुलै |सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर रेल्वे प्रशासनाने चुकीचा फलक लावल्याने येथील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आपला निषेध विविध मार्गांनी नोंदवायला सुरवात केली आहे. सुशोभीकरण करण्यात आलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या त्या चुकीच्या फलका समोरच कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, सावंतवाडी च्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतवाडी स्थानकाचे टर्मिनस म्हणुन भूमिपूजन ९ वर्षापूर्वीच झाले होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाच्या नावापुढे टर्मिनस लावणे अपेक्षित होते. एकीकडे टर्मिनसचे काम रखडवले जात आहे तर दुसरीकडे स्थानकाच्या नावातून टर्मिनस हा शब्द गायब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानकाच्या सुशोभीकरणादरम्यान नवीन फलकावरही टर्मिनस हा शब्द न आल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

 

Loading

आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग लवकरच

   Follow us on        
सिंधुदुर्ग:पावसाळ्यात आंबोली घाट प्रवासासाठी खूपच धोकादायक बनतो, अनेकदा सुरक्षिततेसाठी अवजड वाहतूक बंद करावी लागते. त्यामुळे आंबोली घाटातील मार्गाला पर्यायी मार्ग असावा ही मागणी होत होती. आता या मार्गाला पर्यायी मार्ग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्र, कर्नाटक , गोवा असा तीन राज्यांना जोडणारा आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग केसरी, फणसवडे, नेनेवाडी ,चौकुळ, आंबोली, अशा कमी अंतराच्या मार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून मंजुरीही देण्यात आली आहे. जिल्हा मार्ग क्रमांक 60 असे या मार्गाचे नाव असून 9.2 किमी अंतराच्या या मार्गासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .त्यामुळे गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेला हा पर्यायी मार्ग आता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा पर्यायी मार्ग अखेर मार्गी लागला आहे. अशी माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये केसरी फणसवडे ते नेनेवाडी असा 9.2 किमीच्या मार्गाला 60 कोटी रुपयांची तरतूद करून निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर या मार्गामध्ये वनखाते अथवा इतर आरक्षित जागे संदर्भात दहा कोटी रुपये असे एकूण 70 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा पर्यायी घाट मार्ग व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोकांची मागणी होती. मात्र, या मागणीला आज खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सत्यात उतरवले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर उद्या धावणार मडगाव जं. – चंदीगड वन वे विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News:पेडणे येथील बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आज हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रद्द केलेलया गाड्यांमुळे अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करावा लागला होता. त्यानं दिलासा म्हणून रेल्वे प्रशासनाने उद्या दिनांक १२ जुलै रोजी कोकण रेल्वे मार्गावर एक वन वे विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदिगड वन वे स्पेशल ही गाडी मडगाव ते चंदीगड दरम्यान धावणार आहे. या गाडीचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गाडी क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदीगड वन वे स्पेशल :
गाडी क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदीगड वन वे स्पेशल मडगाव जंक्शन येथून दिनांक 12/07/2024 शुक्रवार रोजी सकाळी 09:00 वाजता सुटेल, ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 18:25 वाजता चंदीगडला पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, पेरनेम, रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, कोटा जंक्शन, एच. निजामुद्दीन जंक्शन, नवी दिल्ली, पानिपत जंक्शन आणि अंबाला कँट स्टेशनवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 22 एलएचबी कोच : कंपोझिट (फर्स्ट एसी + 2 टियर एसी) – 01 कोच, 2 टियर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 04 कोच, इकॉनॉमी 3 टियर एसी – 02 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 04 डबे, पँट्री कार – 1, जनरेटर कार – 02.

Loading

Important: आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या वेटिंग तिकीटधारकांवर होणार कठोर कारवाई; दंडही आकारला जाणार आणि….”

   Follow us on        
Strict Action on Waiting Passnger:रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरक्षित डब्यात होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास संपूर्णपणे मनाई केली आहे. असे प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर आता दुहेरी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून पुढील स्थानकावर उतरविण्यात येणार आहे.
अशी असेल दंडाची रक्कम 
जर कोणी प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन प्रवास करत असेल तर त्याला खालील दंड भरून पुढील स्थानकावर उतरावे लागेल.
एसी कोच दंड  – 440 रुपये + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
स्लीपर कोच दंड – रु 250 + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांच्या आरक्षित डब्यांत होणाऱ्या गर्दीच्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवर या डब्यातील गर्दीचे विडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन उपाययोजना म्हणून ही कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलेले आहे.

Loading

Konkan Railway | “सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण झाले असते तर…….”

   Follow us on        
सिंधुदुर्ग :मागील ९ वर्ष सावंतवाडी टर्मिनसचे काम रखडले आहे. किती जनआंदोलने झालीत तरी रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात रस दाखवला नाही. टर्मिनस म्हणुन भूमिपूजन झाले असतानाही रेल्वे आपल्या रेकॉर्डमध्ये जाणून बुजून या स्थानकाचे नाव ”सावंतवाडी रोड” असेच दाखवत आले आहे. परवा तर हद्द पार झाली आणि सुशोभीकरणा दरम्यान प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर ”सावंतवाडी रोड” अशा नावाचा फलक लावण्यात आला. हेच जर करायचे होते तर टर्मिनस म्हणुन भूमिपूजन फक्त मते मिळविण्यासाठी केले का? असा संतप्त सवाल कोकणी जनतेकडून विचारला जात आहे.
नियतीला कदाचित हे पटले नसावे म्हणा की अन्य काहीही म्हणा, सावंतवाडी येथे टर्मिनस का असावे हे तिने या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी दाखवले. पेडणे येथील एका बोगद्यातून पाण्याचा मोठा पाझर फुटून तेथील मार्ग बंद झाला आणि कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. 30 तास झाले तरी हा बोगदा वाहतुकीसाठी चालू झाला नाही. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या. मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानकांवर उभ्या करून ठेवण्यात आल्यात. अनेक गाड्या रद्द झाल्यात, कित्येक प्रवासी अडकून पडलेत यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर… 
जर सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण झाले असते तर खूप मोठा फरक पडला असता. परवा दिनांक ०९ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या गाड्या निदान सावंतवाडी स्थानकापर्यंत चालविता आल्या असत्या आणि तेथूनच दुसर्‍या दिवशी मुंबईच्या दिशेने पाठवता येवू शकल्या असत्या. टर्मिनसच्या अपुर्‍या कामामुळे फक्त 1/2  गाड्या येथून परस्पर सोडता आल्या असत्या. काल संध्याकाळ पासून संध्याकाळपासून पनवेल ते सावंतवाडी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अनेक गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवणे शक्य झाले असते आणि प्रवाशांचे हाल वाचवता आले असते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग सुद्धा तितकाच महत्वाचा.. 
सावंतवाडी टर्मिनस प्रमाणेच केंदीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकीर्दीत मंजूर झालेले आणि रखडलेले दुसरे काम म्हणजे कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग. पाश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग सुरेश प्रभू केंदीय रेल्वे मंत्री असताना मंजूर झाला होता. मात्र त्याचीही गत सावंतवाडी टर्मिनसच्या कामासारखी झाली. सुरेश प्रभू यांचा केंदीय रेल्वे मंत्री पदावरून पायउतार होताच हे कामही रखडले. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतुद केली जात नसल्याने त्याचे काम थांबले आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास आणीबाणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गाला एक पर्यायी मार्ग म्हणून हा मार्ग वापरता येवू शकतो.
माजी केंदीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेली ही दोन महत्त्वाची कामे रखडली आहेत…या मागे कोणतीही कारणे असूद्यात ..सध्या कोकणातील प्रवाशांना कोणी वाली नाही हे जवळपास अधोरेखित झाले आहे.

Loading

Mumbai Goa Highway | आजपासून तीन दिवस मुंबई गोवा महामार्गावर ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते?

   Follow us on        
Mumbai-Goa highway Block: कोकणकरांसाठी एक मह्त्वाची बातमी आहे. आजपासून मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा (११ जुलै-१३ जुलै) ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक सकाळी ६-८ वा. आणि दुपारी २-४ वा. अशा दोन टप्प्यात असणार आहे. वाहतूक विभाग अप्पर महासंचालकांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लावली जाणार आहे. याच कामाचा भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाच्या कामादरम्यान वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे.
– वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड मार्गे किंवा पाली-रवाळजे- निजामपुर-माणगांव मार्गे.
– खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे.
गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गे
महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक तीन दिवसांत अवघ्या चार तासांसाठी असेल. इतर वेळेत मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

Loading

KR Updates | कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंतच, अजून काही गाड्या रद्द, यादी ईथे वाचा

   Follow us on        

Konkan Railway Updates: दिनांक 10.07.2024 मडुरे – पेडणे विभागादरम्यानच्या पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे ह्याआधी काही गाड्या रद्द केल्याचे तसेच काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यात अजून काही गाड्यांची भर पडली आहे.

कोकण रेल्वेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार खालील गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेटेड आणि अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत

गाडी क्र. 12449 मडगाव जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा चंदीगड एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12620 मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 12134 मंगळुरु जं. – 10/07/2024 रोजी सुरू होणारा मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. 50107 सावंतवाडी टर्मिनस – मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि आंशिक रद्द केलेल्या गाड्या. 

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी – मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे

दिनांक 09/07/2024 रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी टर्मिनस येथे समाप्त करण्यात आला आहे.

 

Loading

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या गाडय़ा मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

Konkan Railway Updates : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील अडकलेल्या गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती खालील प्रमाणे 

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. २२११३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस राजापूर रोड येथून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 19260 भावनगर – कोचुवेली एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावरून मागे फिरवून पनवेल – पुणे जंक्शन – सोलापूर जंक्शन मार्गे मागे वळवली आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र.१२२२३ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम एक्स्प्रेस चिपळूण येथून मागे फिरवून पनवेल-पुणे जंक्शन- सोलापूर जंक्शन मार्गे वळविण्यात आला आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु केलेली गाडी क्र. 20932 इंदूर जं. – कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास सुरत – जळगाव – बडनेरा जं. – वर्धा जं. – बल्हारशाह – वारंगळ – विजयवाडा जं. – रेनिगुंटा जं. – काटपाडी जं. आणि कोईम्बतूर मार्गे वळविण्यात आला आहे.

Loading

Breaking: कोकण रेल्वे ठप्प; अनेक गाड्या रद्द तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या

   Follow us on         Kokan Railway Stopped :काल दिनांक 09/07/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कारवार विभागातील मडूरे-पेडणे विभागादरम्यानच्या बोगद्यात पाण्याच्या फुटलेल्या मोठ्या पाझरामुळे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल जमा झाला होता. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली होती. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी कोकण रेल्वेने मोठ्या शर्थीने प्रयत्न करून हा बोगदा वाहतुकीसाठी योग्य केला आणि वाहतुक सुरू केली होती मात्र आज(10/07/2024) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पुन्हा मोठा पाझर फुटला आणि बोगद्यात पुन्हा पाणी जमा झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

अनेक गाड्या रद्द
या घटनेमुळे कोकण रेल्वेने या मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या असून तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्या आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु एक्सप्रेसचा ०९/०७/२०२४ रोजी सुरु होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०४ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसचा – दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. – सावंतवाडी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवासी प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी – जनशताब्दी एक्स्प्रेसचा १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेसचा दिनांक १०/०७/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

खालील गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार आहेत.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १२६१८ एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. मंगला पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव मार्गे चालविण्यात येणार आहे.

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र. १६३३६ नागरकोइल – गांधीधाम एक्स्प्रेसचा शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक ०९/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२२८३ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवली जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. २२६५५ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

दिनांक १०/०७/२०२४ रोजी प्रवास सुरू करणार्‍या गाडी क्र.गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून 16:55 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आला आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे – इरोड जं.- धर्मावरम – गुंटकल जंक्शन – रायचूर – वाडी – सोलापूर जं. – पुणे जं. – लोणावळा – पनवेल आणि पुढील योग्य मार्ग..

 

More Information Awaited…… 

Loading

पेडण्यात रुळांवर पाणी; कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत

Konkan Railway Stopped: तळकोकणात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मालपे (पेडणे) येथील बोगद्यात रूळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे.

पाणी साचल्याने मार्ग पूर्ण झाला असून दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाड्या गोवा राज्यातील स्थानकांवर तर दक्षिणेला जाणार्‍या गाड्या सिंधुदुर्गातील स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गाड्यांची सद्यस्थिती पाहता (08:00 PM) गोव्याचा दिशेने जाणार्‍या गाड्यांपैकी तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस अजुनहि सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्या नाही आहेत. तर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर आहे.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी याबाबत अजूनही कोणती माहिती आली नसली तरी रेल्वे कर्मचारी त्या बोगद्याकडे पोहोचले असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search