
सिंधुदुर्ग : मडुरे स्थानकावर काही गाड्यांना थांबा द्यावा तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा लेखी इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.
सावंतवाडी स्थानका नंतर मडुरा हे स्थानक लागते. मात्र या स्थानकाकडे प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष केले आहे. या स्थानकावर फक्त दिवा पॅसेंजर ही गाडी थांबत असून बाकी हे स्थानक फक्त नावालाच आहे. कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळणेसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सर्व स्थानिक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे थांबा देणेसाठी वारंवार मागणी करीत आहोत मात्र आपल्या मागण्यांना नेहमी प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे, त्यामुळे आता उपोषण हाच पर्याय उपलब्ध असल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.
गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य!
पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या… pic.twitter.com/sZLBip4UAt
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 12, 2023
कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून ती कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे. यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कोल्हापूरकरांना वंदे भारतसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी वेगवान प्रवासाच्या आशा नक्की पल्लवित झाल्या आहेत.
महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन येथे थांबेल. मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानच्या वंदे भारतला फक्त 7 तास लागतील आणि या शहरांमधील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर बारा महिने पर्यटकांनी बहरुन जाते. मात्र, प्रवासात खूप वेळ जात असल्याने मोठी कुचंबणा होत आहे.
वंदे भारत सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्या, तरी तत्काळ सुरू होईल याची शक्यता कमी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचं कारण देत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस मार्च 2024 नंतर धावू शकते असं म्हटलं आहे. या मार्गावरील तांत्रिक अडचणी, रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, पुणे मिरज मार्ग दुहेरी करण्याची काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या मिरज- पुणे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूर आणि मिरज दरम्यानचा मार्ग एकेरी आहे, जेव्हा आमची कामं पूर्ण होतील, त्यावेळी वंदे भारत ट्रेन सुरु करणं शक्य होईल, अशी भूमिका विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी अलीकडेच मांडली होती.
दुसरीकडे, मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे. मात्र, ट्रेनला लागणाऱ्या वेळेमुळे अनेकजण कोल्हापूरला येण्याचे टाळतात. कोल्हापुरातूनही देशभर पर्यटक जात असतात, त्यांच्यासाठी देखील ही ट्रेन खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत 25 वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये चार मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मुंबईहून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद देखील प्रचंड असणार आहे.
सिंधुदुर्ग :चाकरमान्यांना भारतीय जनता पक्षाकडून एक खुशखबर आहे. सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी, “भाजपा एक्सप्रेस” हि रेल्वेगाडी पक्षातर्फे चालविण्यात येणार आहे.
ही गाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळ – मालवण साठी सोडण्यात येईल. इच्छुक कोकणवासीयांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (सोमवार ते शनिवार) कार्यालयात येवून आपली सीट बुक करावी असे आवाहन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे केले आहे.
बुकिंग साठी संपर्क –
+९१- ८६५७ ६७६४०४
+९१- ८६५७ ६७६४०५
नमस्कार
सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी, "भाजपा एक्सप्रेस" हि रेल्वेगाडी दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळ – मालवण साठी सोडण्यात येईल. इच्छुक कोकणवासीयांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क… pic.twitter.com/DI6jxXVVMh
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 11, 2023
Content Protected! Please Share it instead.