
रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याचे “प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” असे नामकरण करावे आणि महत्वाचा अशा रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजिस्टर) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.
या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते ठोकूर असा कोकण रेल्वे मार्ग असला तरी महाशय कोकण रेल्वे प्रवासी यांचा रेल्वे प्रवास वा कोकणवासियांच्या तळ कोकणातील अत्यंत अतिमहत्वाचे स्थानक “सावंतवाडी रोड” होय. कालांतराने आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक असे नावारूपास आले. कोकणवासियांच्या महत्त्वाच्या मेल/ एक्सप्रेस मधील जनशताब्दि एक्स., मांडवी एक्स., कोकणकन्या एक्स,. या गाड्यांव्यतिरिक्त तुतारी एक्स. व दिवा एक्स. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दैनंदिन प्रकारात आग कोकणवासियांना या एक्सप्रेस गाड्यांचा बराच मोठा फायदा तर होतोच आहे; परंतु दैनंदिन गाड्यांच्या तुलनेत आणि सावंतवाडी हे तळकोकण चे रेल्वे स्थानक असल्यामुळे खालील काही मुद्दे मांडत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासाठी अधिक थांब्यासाठी काही गाड्यांची मागणी करीत आहोत असे राजू कांबळे यांनी सांगितले.
१. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळावा यासाठी पूरेपूर यशस्वी प्रयत्नशील राहत कार्य सिद्धीस करावे.
२. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देवून *प्रा. मधू दंडवते टर्मिनल्स* असे नामकरण करण्यात यावे.
३. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट विक्री खिडकी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी.
३. गाडी क्र.१२६१८/१२६१७ मंगला लक्षद्विप एक्सप्रेस, निजामउद्दीम-एर्नाकूलम/ एर्नाकूलम-निजामउद्दीम. या दैनंदिन गाड्यंस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.
४. गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-तिरूवअनंतपूरम/तिरूवअनंतपूरम-लो. टिळक टर्मि. या दैनंदिन गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.
५. गाडी क्र. १२६१९/१२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-मेंगलोर सेन्ट्रल/मेंगलोर सेंट्रल-लो. टिळक टर्मि., या गाड्यांसही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.
६. गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर-मडगांव विशेष/मडगांव-नागपूर विशेष गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.
७. गाडी क्र. २२२२९/२२२३० वन्दे भारत एक्सप्रेस, मुंबई-मडगांव/मडगांव- मुंबई या वातानुकूलित गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहोत.
महोदय, कोकणवासियांच्या गर्दीचा वाढता ओघ पाहता तसेच सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच गावांचा
समूह असताना तळ कोकण म्हणून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सदर गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबे मिळाल्यास इतर गाड्यांवरील प्रवाशांचा गर्दीचा भार कमी होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त कोकणवासियांना याचा बऱ्याच मोठ्या संख्येने लाभ घेता येईल. महोदय कृपया या निवेदनाचा प्रत्यक्षपणे सबब पाहता कार्य सिद्धीस आणावे ही समस्त कोकणवासियांची मनपेक्षा.
रत्नागिरी, दि.२६ : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवार दि. २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओळांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या २७ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण धबधब्यावरील पर्यटनास दोन महिने बंदी घालण्याचे आदेश तहसिलदार प्रमोद कदम यांनी दिले आहेत. मुचकुंदी धरण खोरनिनको हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. असंख्य पर्यटक पावसाळ्याच्या कालावधीत धरणावर आंघोळीसाठी येत असतात. पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
खोरनिनको सोबत सवतकडा आणि प्रभानवल्ली या ठिकाणच्या धबधब्यावरसुद्धा प्रशासनाने बंदी घातली असल्याने असंख्य हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
Special Unreserved Trains: गणेशोत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई आणि कुडाळ दरम्यान 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांमुळे आता एकूण विशेष सेवा 266 एवढ्या झाल्या आहेत.
01185/01156 LTT-KUDL-LTT(Tri-Weekly) Unreserved Special
01185 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
01186 स्पेशल कुडाळहून सोमवार, बुधवार आणि शनिवारी 13.09.2023 ते 02.10.2023 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीचे थांबे : ठाणे,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली , विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबे असतील.
डब्यांची संरचना : या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 24 सामान्य द्वितीयश्रेणी डबे असतील.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज दिनांक २६ जुलै रोजी कोकण आणि त्याचा लगतच्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्या लगतच्या सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्ट च्या पार्श्ववभूमीवर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.
सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि मुंबई या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना आज बुधवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज दिनांक २६ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी आज २६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Content Protected! Please Share it instead.