सिंधुदुर्ग: समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याकरिता शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतिम लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
खालील योजनांच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना लाभार्थी यादी |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभार्थी यादी |
श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी |
संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान लाभार्थी यादी |
ह्या सर्व याद्या पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.
टीप: पीडीएफ डाउनलोड होण्यास काही अवधी लागू शकतो. कृपया संयम ठेवा. लिस्ट वर क्लिक केल्यास खाली पीडीएफ च्या खाली पेजेस बदलण्यासाठी किंवा झूम करून पाहण्यासाठी ऑप्शन येईल.
डाऊनलोड करता येणार अशा फाईल 👇🏻









रत्नागिरी :खेड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.पोलादपूरजवळ कशेडी घाटात चोळई येथे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.
यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
हा अपघात म्हणजे एक घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे.या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
MOPA Airport news :उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले
उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .
(Also Read>मोपा विमानतळ ! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे ‘द्वार’)
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.
मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.
सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे. पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.
(Also Read>तरच आपली लालपरी वाचेल…. )
सिंधुदुर्ग:आचरा येथील श्री निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.
या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी , श्री दशरथ घाडी , श्री रमेश पुजारे , श्री गावकर , श्री अरविंद सावंत , श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा पद्धतीप्रमाणे श्रीफळ दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. . सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. . देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. . देवराईतील औषधी वनस्पती , देव वृक्ष ,नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते.
Mumbai Goa Highway News :मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकार्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. मागील 14 वर्षांपासून रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
महामार्गाचे अपुरे काम आणि त्यामुळे लोकांना ये-जा करताना त्रास होऊ नये म्हणून ह्या मार्गावरील निदान खड्डे भरून काढावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका कोकणसुपुत्र अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
(Also Read>मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी ‘स्वाक्षरी’ मोहीम… मुंबई आणि आजूबाजूच्या ‘ह्या’ शहरांत होणार आयोजन..)
न्यायालयात सादर केलेल्या NHAI च्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर ह्या पट्ट्याच्या अर्ध्या भागाचे पूर्ण काम झाले आहे असे लिहिले आहे. पण जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमा केलेल्या फोटों आणि व्हीडिओंमध्ये ह्या पट्ट्यातील खड्डे स्पष्ट दिसत होते. हा पुरावा अॅड ओवेस पेचकर यांनी न्यायालयात सादर करून NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा खोटेपणा सिद्ध केला. न्यायालयाने ह्या सर्व प्रकाराबाबत फटकारले असता आपण दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत ह्या मार्गावरील खड्डे बुजवून देवू आणि 2023 अखेपर्यंत हे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करू असे NHAI आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी ह्यावेळी सांगितले आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी असेल असे जाहीर केले. तत्पूर्वी सविस्तर प्रतिज्ञा पत्र सादर करा असे आदेश NHAI दिले आहेत.