मुंबई:जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसंना प्राधान्य देतात. या गाड्यांचा जवळपास 90% मार्ग Route महाराष्ट्र राज्यात असल्याने या दोन्ही गाड्यांतून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत असतात. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी या आवाहनाचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.
यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग : बाजारात ओल्या काजूगरांची मागणी खूप आहे आणि चांगला दर सुद्धा आहे. सुरुवातीला तर चक्क 500 रुपये शेकडा एवढा दर ह्या ओल्या काजू गरांना मिळतो. मुंबई पुण्यात तर ओल्या काजूगरांची प्रचंड मागणी असते. पण काजूमधुन गर बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप कंटाळवाणी आणि वेळखाऊ आहे. डिंक लागून शरीराला इजा पण होते. त्यामुळे चांगला दर मिळत असूनही कोकणातील काजू उत्पादक ओले काजूगर विकण्यास निरुत्साही दिसतो.
यावर उपाय म्हणुन युवा उद्योजक मिथिलेश देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांजा येथे ओले काजू बी सोलायच्या मशिनची निर्मिती केली आहे. त्यांचा विश्वास आहे की हे उपकरण काजू उत्पादकांच्या उत्पादन हमखास वाढ घडवून आणेल. हे मशीन ग्राहकांसाठी कोकणातील उद्योजकांसाठी सदैव आघाडीवर असलेल्या अभिनव उद्योग प्रबोधिनी ने कुडाळ येथे उपलब्ध करून दिली आहे.
बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर Cashew Machine असा व्हॉट्स ॲप मेसेज पाठवावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.