Category Archives: अपघात

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on        

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Railway Accident : रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

No block ID is set

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी येथील स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धोकादायक पद्धतीने ‘रील’ (Reel) बनवण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन समवयस्क तरुणांचा धावत्या रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र ननवरे (१८) (दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव) अशी आहेत.

रविवारी सुट्टी असल्याने हे दोघे पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटजवळ सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे मार्गावर उभे राहून रील बनवत होते. त्याच वेळी धरणगावच्या दिशेकडून जळगावकडे जाणारी ‘अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस’ आली.

प्रशांत आणि हर्षवर्धन यांनी कानावर हेडफोन लावलेले असल्याने, रेल्वे रुळांजवळ आलेल्या या वेगातल्या गाडीकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. यामुळे रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर त्यांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठिकाणी रील बनवण्याच्या फॅडमुळे तरुणांचे जीव जात असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

 

 

गुहागर : मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटला, क्लिनर जखमी

   Follow us on        

गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on        

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on        

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

   

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

आरे-वारे दुर्घटना: तीन सख्ख्या बहिणींचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रत्नागिरी:आरे-वारे समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मृतांमध्ये ३ सख्ख्या बहिणींचा समावेश आहे आणि एकीच्या नवऱ्याचा समावेश आहे. या मुलींचे वडील शमसुद्दीन शेख हे दुबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून मुली व जावयाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तातडीने ते रत्नागिरी येथे येण्यासाठी निघाले असून त्यानंतर तिनही मुलींवर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगण्यात आले.

उज्मा शमसुद्दीन शेख (१८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जेनब जुनेद काझी (२८) अशी या तीन सख्ख्या बहिणींची नावे आहेत. तर जैनब यांचे पती जुनेद यांचाही आरे-वारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. १९ जुलै रोजी शमसुद्दीन यांच्या ३ मुली व जावई हे दुचाकीवरुन आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शमसुद्दीन यांच्या मुली सुट्टी असल्याने रत्नागिरीत आल्या होत्या. तर त्यांचे वडील हे दुबई येथे वास्तव्यासाठी होते. घटनेची तातडीने खबर शमसुद्दीन यांना कळविण्यात आली. यानंतर दुबई येथून ते भारतात येण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चारही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहेत. मुलींचे वडील आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

Bridge Collapse: गुजरातमध्ये पूल कोसळला, अनेक वाहनं पडली

   Follow us on        

अहमदाबाद: गुजरातमध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाल्याची धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं सांगितलं जात आहे. आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळून हा अपघात झाला. पूल कोसळला तेव्हा त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु होती. त्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा पूल 45 वर्ष जुना असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीरा पूल कोसळल्याने वडोदरा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात धक्का बसला. वडोदरा जिल्ह्यातील पदराला आनंद जिल्ह्याशी जोडणारा हा पूल बराच काळापासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा एक भाग बुधवारी (9 जुलै) सकाळी कोसळला, ज्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. पदराचे पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महामार्गावर सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रक आणि दोन व्हॅनचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत चार जणांना सुरक्षित बचावलं आहे आणि इतर अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.

मुजपूर गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रक, एक बोलेरो जीप, दुसरी एक गाडी पूल ओलांडत असताना अचानक पुलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या महिसागर नदीत ही चारही वाहनं कोसळली. स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी जमा झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली

Banda: एसटी बस दुसर्‍या बसवर आदळली आणि १०० फूट फरफटत नेले; बांद्याजवळ २ एसटी बसमध्ये मोठा अपघात

   Follow us on        

Banda: बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही पण दोन्ही बस मधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. “बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत.” अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search