Category Archives: महाराष्ट्र

मराठी भाषेवर पुन्हा अन्याय…सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांच्या अनुवाद भाषेत स्थान नाही….

  • देशात ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी असूनही तिला स्थान नाही
  • मराठी भाषेपेक्षा कमी बोलल्या जाणाऱ्या गुजराथी आणि ओडिया भाषेला स्थान
दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रे यापुढे इंग्रजी वगळता भारतातील इतर चार भाषेत उपलब्ध होतील असे  आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी मंगळवारी तशाआशयाची माहिती प्रसिद्ध केली होती. या चार भाषेत हिंदी, गुजराथी, उडिया आणि बांगला या भाषेचा समावेश आहे. देशात सर्वच नागरिकांना इंग्रजी भाषा वाचता येत नसल्याने न्यायालयाची निकालपत्रे तळागाळातील नागरिकांना समजावीत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. 
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खूप कौतुकास्पद असला तरी मराठी भाषेवर अन्याय करणारा आहे. जणगणनेनुसार देशात मराठी भाषेचा हिंदी आणि बंगाली ह्या भाषेनंतर तिसरा क्रमांक लागतो. ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी आहे. टक्केवारीत बोलायचे झाल्यास हे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या ६.८६% एवढे आहे. त्यामुळे निकालपत्रासाठी मराठी भाषेला स्थान द्यायला हवे होते. ते न देता सातव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या अनुक्रमे गुजराथी(५.५४ करोड भाषिक) आणि उडिया (३.७५ करोड भाषिक) या भाषेंना स्थान देण्यात आलेले आहे. केंद्र असो वा सर्वोच्च न्यायालय  या आधी पण अनेकदा असे मराठी भाषेला डावलण्याचे प्रकार घडले आहेत. 
 
देशातील सर्वात जास्त बोलण्या जाणाऱ्या १० भाषा.
Language Speakers
Hindi 52.83 crore
 Bengali 9.72 crore
Marathi  8.30 crore
Telugu 8.11 crore
Tamil 6.90 crore
Gujarati 5.54 crore
Urdu 5.07 crore
 Kannada 4.37 crore
Odia 3.75 crore
Malayalam 3.48 crore

Source – 2011 Census of India

Loading

राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा! महाराष्ट्रातील ७४ पोलिसांचा मिळणार हा सन्मान.. जाणून घ्या नावे.

   Follow us on        

नवी दिल्ली :केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ७४ जणांना पदक जाहीर झाले. त्यामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता ४ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ आणि ३१ जणांना ‘पोलीस शौर्य पदक’पोलीस शौर्य पदक’ यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी  राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. राज्यातील ३१ अधिकारी व शिपायांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची नावे.

पोलीस शौर्य पदक विजेत्यांची नावे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

 

Loading

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

Loading

महाराष्ट्रात लवकरच दिसणार आहेत महिला एसटी बसचालक….

MSRTC NEWS : एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच प्रथमच महिला चालक बसचे स्टेरिंग हातात घेणार आहेत. औरंगाबाद येथे  मागील एक वर्षांपासून  १६३ महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या मार्च अखेर हे प्रशिक्षण पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या सुरवातीस महाराष्ट्राच्या रस्त्यावर प्रत्यक्ष महिला बसचालक एसटी बस चालवताना  दिसतील असे महामंडळातर्फे सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी महिला चालक ह्या पदाकरिता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च २०१९ मध्ये सुरू झाली. मात्र करोना निर्बंध, बेमुदत संपामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. त्यांचे बंद झालेले प्रशिक्षण गेल्यावर्षी मार्च मध्ये पुन्हा सुरु झाले होते.
मार्चअखेर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची एक दिवसाची अंतिम चाचणी घेतली जाईल. उत्तीर्ण होणार्यांना बस चालविण्याची परवानगी मिळेल. नापास होणाऱ्यांना पुन्हा १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन एक संधी दिली जाईल. त्यानंतरहि नापास होतील त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल असे एसटी प्रशिक्षण विभागाचे वाहतूक निरीक्षक अनंत पवार म्हणाले आहेत.
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

Loading

रत्नागिरीत गॅस सिलिंडरचा स्फोट..२ महिला अडकल्याची भीती

रत्नागिरीः रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील पाच जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन महिला घरातच अडकल्या आहेत. त्याना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत

अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अश्फाक काझी पहाटे पाचच्या सुमारा घरी आले व त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे

Loading

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली…निलेश राणे यांचे त्याच भाषेत प्रत्युत्तर..

 

मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यास प्रत्युत्तर म्हणुन माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा त्याच भाषेत समाचार घेतला. संजय राऊत जिथे भेटतील तिथे त्यांना फटके देवू अशी धमकी ही त्यांनी दिली आहे.

 

 

 

Loading

पगार रखडले.. एसटी कर्मचारी आक्रमक

 

MSRTC Employees News :महिन्याची 12 तारीख उलटली तरी पगार झाला नसल्याने एसटी कामगार चिडले आहेत. मागे एसटी कामगारांनी संप केला होता, त्यावेळी हायकोर्टाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे कोर्टात मान्य केले होते. पण महामंडळ आपला शब्द पाळत नसून कोर्टाचा अवमान करत असल्याचे दिसत आहे.

(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर)

काल 12 तारखेपर्यंतही वेतन न झाल्याने हा कोर्टाचा केलेला अवमान आहे. शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे असे ते पुढे म्हणाले.

 

Loading

एसटीच्या ‘अच्छे दिन’ साठी ‘हि’ त्रिसूत्री आवश्यक

MSRTC NEWS: राज्यातील एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी राज्य सरकारने त्रिसूत्री कार्यक्रम राबविल्यास आशिया खंडातील सर्वात मोठे महामंडळ नफ्यात येण्यास वेळ लागणार नाही, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी  कामगारांच्या संवाद बैठक मेळाव्यात व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, राज्यातील इतर महामंडळापेक्षा एसटी महामंडळ हे राज्य सरकारला उत्पन्न मिळवून देत राज्याच्या विकासात आर्थिक हातभार लावत असते राज्य सरकारने एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी त्रिसूत्री राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे हि त्रिसूत्री?
1) एसटी टोलमुक्त करावी.
राज्यात आता महामार्गाचे जाळे विणले जात आहे हि एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ह्या महार्गावरील आकारण्यात येणारी टोल रक्कम जास्त असल्याने काहीवेळा ती एसटीला परवडण्यासारखी नाही आहे. काही फेऱ्या जनहितासाठी कमी प्रवासीसंख्या असतानासुद्धा चालू ठेवाव्या लागतात ह्याचा विचार करून एसटीला पूर्ण राज्यात टोल मुक्ती देण्यात यावी.
2)डिझेलवरील अबकारी कर राज्य सरकारने माफ करावा. 
पेट्रोल आणि  डिझेल वरील केंद्र सरकार द्वारे लावण्यात येणाऱ्या कर कमी होण्याची शक्यता नाही कारण तो पूर्ण देशात सर्व राज्यांना निश्चित स्वरूपाचा असतो. पण राज्यस्तरावर  लावण्यात येणाऱ्या अकबारी करात सवलत किंवा तो एसटीसाठी माफ केल्यास वाहतूक खर्चात बचत होऊन एसटी महामंडळ फायद्यात राहील. एसटी महामंडळ हे राज्याचा अंगीकृत व्यवसाय असल्याने एसटी महामंडळाला राज्यसरकारकडून हि अपेक्षा आहे.
3)प्रवासी कर कमी करावा.
संदीप शिंदे यांनी महामंडळ चालवण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळ भरत असलेल्या  प्रवासी कर कमी करावा अशी मागणी केली आहे. देशातील इतर राज्याची तुलना करता महाराष्ट्रात हा कर जास्त आहे.
राज्यसरकारने जाहीर केलेल्या विविध वर्गासाठी विविध सवलती म्हणजे वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, अपंगासाठी तसेच विध्यार्थ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दराने प्रवास इत्यादी एसटी कडून राबवण्यात येत असतात. काही वेळा प्रवासीसंख्या कमी असूनही जनहितासाठी काही खेडोपाडी बसफेऱ्या चकवाव्या लागतात. हे सर्व विचारात घेऊन राज्यसरकारने एसटीच्या बचावासाठी हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Loading

अबब! राज्यातील तळीरामांनी 9 महिन्यात रिचवले 58 कोटी लिटर मद्य…

मुंबई :एप्रिल 2022 पासून पुढील 9 महिन्यात राज्यातील मद्य विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. खासकरून विदेशी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. ह्या विक्री वाढीमुळे सरकारच्या महसुलात 30% वाढ झाली आहे. मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर ही वाढ दिसून आली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.

(Also Read >उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र)

कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे. तर विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.

Loading

उद्योजकांसाठी खुशखबर! रत्नागिरी MIDC क्षेत्रातील भूखंड वाटपासाठी तयार…अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी

रत्नागिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे (MIDC) रत्नागिरी येथे २ औद्योगिक क्षेत्रांकरिता उपलब्ध भूखंड वाटप केले जाणार आहे. हे वाटप “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” ह्या तत्वावर (सामान्य/अ.जा./अ.ज. ह्या प्रवगासाठी राखीव) ऑनलाईन सरळ पद्धतीने केले जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४/०१/२०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

खालील औद्योगिक क्षेत्राकरिता अर्ज मागवले आहेत.

औद्योगिक क्षेत्र वाटपास उपलब्ध क्षेत्र
(हे. आर)
भूखंडाची संख्या 
अतिरिक्त लोटे परशुराम 10.24 12
अडाळी 32.02 210

वाटप केल्या जाणाऱ्या भूखंडाचे दर,क्षेत्र आणि इतर माहितीसाठी खालील पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. 

(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)

अर्ज करण्यासाठी आणि इतर सविस्तर माहितीकरिता https://www.midcindia.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी

   Follow us on        

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search