कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
Konkan Railway News :काल पनवेल स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरून जाणार्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अजून पर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळित असून ती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन डबे या मार्गावरून बाजूला करण्याचे काम चालू आहे.
या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.
शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 10103 CSMT-madgaon mandvi exp
Konkan Railway News: पनवेल जवळ कळंबोली येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मागावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही दुर्घटना दुपारी ३ वाजता घडली होती. या दुर्घटनेमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रखडल्या आहेत. सध्या या मार्गावरील हे घसरलेले डबे हटवण्याचे काम सुरु आहे. सिंगल रुळावरून धिम्यागतीने गाड्या सोडल्या जात असून वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास अजून काही वेळ लागेल. जवळपास 250 कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. याचा परिणाम कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव या गाड्यावर सुद्धा झाला असून या गाड्या मुंबईवरून सुमारे ३ ते ४ उशिराने सुटणार आहेत.
1) २०१११ सीएसएमटी मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस- १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता सीएसएमटी वरून पुनर्नियोजित वेळेत सुटेल
2) ११०९९ एलटीटी मडगाव एक्स्प्रेस- एलटीटी वरून १/१०/२३ रोजी पहाटे ४.०० वाजता पुनर्नियोजित वेळेवर निघेल.
याबरोबरच चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आलेल्या मेमू गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे
१) ०७१०४ मडगाव-पनवेल मेमू- रत्नागिरी-पनवेल दरम्यानची अर्धवट रद्द करण्यात आली आहे, ती फक्त मडगाव-रत्नागिरी विभागात चालेल.
२) ०७१०५ पनवेल-खेड मेमू पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
Kokan Railway News:पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी आज दुपारी पनवेल – कळंबोली विभागात रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज दुपारी पनवेल-कळंबोली विभागात 15.05 वाजता मालवाहू मालगाडी रुळावरून घसरली आहे. या गाडीचे 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरल्याने या मार्गावरील खालील गाडयांना रोखून ठेवण्यात आले आहे.
अ) डाउन गाड्या-
१) १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे
2) १२६१९ एलटीटी – मंगळुरु एक्स्प्रेस- ठाणे येथे
3) ०९००९ मुंबई सेंट्रल- सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे
ब) अप गाड्या-
1) २०९३१ कोचुवेली- इंदूर एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे
2) १२६१७ एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे
Konkan Railway News :गणेशोत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यापासून एकूण 6 विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मडगाव ते पनवेल सेवा
1)गाडी क्रमांक 07104 मडगाव – पनवेल ही विशेष गाडी उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे.
2)परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पनवेल या स्थानकावरून रात्री 21:10 वाजता निघून दुसर्या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचणार आहे.
खेड ते पनवेल सेवा
3)गाडी क्रमांक 07106 खेड – पनवेल विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 15:15 वाजता खेड या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
4)गाडी क्रमांक 07105 पनवेल – खेड विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी रात्री 21:10 वाजता पनवेल या स्थानकावरून निघणार असून रात्री 01:10 वाजता खेड या स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून एकूण 8 कोचसहित चालविण्यात येणार आहेत.
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील चालविण्यात येणाऱ्या ७ गाड्यांच्या वेळापत्रकात किंचितसा बदल करण्यात आला आहे. एकूण ६ गाड्यांच्या अंतिम स्थानकावर आगमनाच्या Arrival वेळेत हा बदल करण्यात आला असून रोहा दिवा या मेमूच्या सर्व स्थानकांच्या वेळापत्रकात बदल केला गेला आहे.
१) Train No. 12052 Madgaon – CSMT Jan Shatabdi Express
या गाडीची मुंबई सिएसएमटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:३० वरून २३:५५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
२) Train No. 22120 Madgaon – CSMT Tejas Express
या गाडीची मुंबई सिएसएमटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:५५ वरून मध्यरात्री ००:२०अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
३) Train No. 16346 Netravati Express
या गाडीची मुंबई एलटीटी या स्थानकावर येण्याची वेळ १६:४६ वरून १७:०५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
Konkan Railway News : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा ३० ओक्टोम्बर २०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ०६/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा २७/१०/२०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०९/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ३०/१०/२०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
Kokan Railway News :कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.
ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर या स्थानकावर मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
मुंबई :चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून तिकीट विकत घ्यायचे आणि शेवटी रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकणाऱ्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर यायला लागलीआहे.
रेल्वेच्या अशाच भोंगळ कारभारामुळे काल ४ ते ५ प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार घडला आहे. विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक १०१०५ या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगिंवर चुकीचा टाकला आहे. या चुकीमुळे त्यांच्यासहीत सुमारे ४ ते ५ कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन काल १६ तारखेला चुकली.
दिवा – सावंतवाडी गाडीचा गाडीवरील १०१०५ क्रमांक नमूद करून ही चूक सुधारावी. सोबत काल रेल्वे कडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे होते ते मी अर्धा तिथे उपस्थित असूनही झालेले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा Announcement योग्य प्रकारे केली जात नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते. मात्र तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.