Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘वन वे स्पेशल’ गाडी

   Follow us on        

Konkan Railway: सणासुदींदरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर एक ‘वन वे स्पेशल’ गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या शुक्रवारी ही ‘वन वे स्पेशल’ गाडी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान चालविण्यात येणार आहे. या गाडीची अधिक माहिती खालीलप्रमाणे,
गाडी क्र. ०२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष
ही गाडी शुक्रवार दिनांक ०१/११/२०२४ रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल.ती त्याच दिवशी संध्याकाळी १९.२० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल.
या गाडीचे थांबे: थिवि, सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण,रोहा आणि ठाणे
डब्यांची रचना: एकूण १६ एलएचबी कोच = विस्टा डोम – ०१, एसी चेअर कार – ०३, सेकंड सीटिंग -१०, एसलआर- ०१, जनरेटर कार -०१

माणगाव रेल्वे स्थानकावर मराठी भाषेची ‘हत्या’

   Follow us on        
रायगड: अलीकडेच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मात्र याच भाषेचा चक्क महाराष्ट्रातच अपमान होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने वापरून तिची ‘हत्या’ करण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माणगाव रेल्वे स्थानकावर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम  कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकावरही हे काम चालू आहे. मात्र या सुशोभीकरणादरम्यान या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मराठी भाषेमध्ये कंत्राटदाराकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत.  “स्वर्ग कोकणाचा मातीवर”, “कोकणाचा निसर्गात वंदे भारत” अशी चुकीची वाक्ये इथे वापरण्यात आली आहेत. तर येथे लावण्यात एका फलकावर काही स्थानकांची नावे मराठीत लिहिण्यात चुका झाल्या आहेत. जसे कि कुडाळच्या जागी “कुंडल”, माणगाव च्या जागी  “मांणगाव”  इत्यादी
रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी X च्या माध्यमातून या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या असून त्या  लवकरात लवकर सुधारण्यात याव्यात अशी मागणी  केली आहे.
 

महत्त्वाचे: दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात गावी जाण्यासाठी दिवा-सावंतवाडी-दिवा या गाडीला पसंदी देणार्‍या कोकणकरांसाठी या गाडीच्या वेळापत्रका संदर्भात एक बातमी रेल्वे प्रशासनाकडून आली आहे. या गाडीच्या दरवर्षीच्या बिगर पावसाळी Non Mansoon वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. या गाडीच्या काही स्थानकांवरील आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

नविन बदल खालील प्रमाणे 

गाडी क्रमांक १०१०५ – दिवा सावंतवाडी एक्सप्रेस

स्थानकाचे नाव पूर्वीची वेळ  सुधारित वेळ 
RATNAGIRI 14:25 14:05
NIVASAR 14:50 14:26
ADAVALI 15:01 14:41
VERAVALI (H) 15:12 14:52
VILAVADE 15:23 15:08
SAUNDAL 15:33 15:19

 

गाडी क्रमांक १०१०६ – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस

स्थानकाचे नाव पूर्वीची वेळ  सुधारित वेळ 
ACHIRNE 9:43 9:41
VAIBHAVWADI RD 9:54 9:53
KHAREPATAN ROAD 10:05 10:02
RAJAPUR ROAD 10:16 10:12
SAUNDAL 10:26 10:21
VILAVADE 10:39 10:31
VERAVALI (H) 10:47 10:45
SANGMESHWAR 13:00 13:01
ARAVALI ROAD 13:12 13:13
SAVARDA 13:24 13:25
KHED 14:10 14:11
VINHERE 14:34 14:35

वरील दिलेल्या स्थानकां व्यतिरिक्त या गाडीच्या ईतर स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल केला गेला नाही आहे.

Konkan Railway: प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली ही गाडी आता एलएचबी स्वरूपात धावणार; स्लीपर डब्यांमध्येही कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सुरवातीपासून धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. अलीकडेच या गाडीच्या छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे या गाडीचे जुने डबे बदलून नवीन स्वरूपाचे एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेनंकडून होत होती.
दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२६२०/१२६१९ मंगुळुरु – एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक १७ फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल 
ही गाडी सध्या २३ आयआरएस कोच सहित धावत असून सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार २२ एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
सध्याची संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४,  सलीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर  – ०२  असे मिळून एकूण २३ आयआरएस डबे
सुधारित संरचना  – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी – ०२, सलीपर – ०८, जनरल – ०४, दिव्यांगनासाठी  – ०१, ब्रेकव्हॅन  – ०१  असे मिळून एकूण २२ एलएचबी  डबे
सुधारित संरचनेत या गाडीच्या जनरल डब्यांत कपात करण्यात आली असून त्यांची संख्या ११ वरुन ८ वर आणण्यात आली आहे. तर एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २ जोडण्यात येणार आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले होते. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत होती. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. अलीकडेच या गाडीच्या छताचा काही भाग कोसळल्याचा विडिओ एका प्रवाशाने X या समाज माध्यमावर पोस्ट केला होता.

ओंकार लाड; वैभववाडीचा ‘संदेश जिमन’

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम  साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या  माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला

Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत NRMU चा विजय

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.

लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.

Video: रत्नागिरी रेल्वे स्थानकात पावसामुळे पीव्हीसी शीट निघून लोंबकळण्याचा प्रकार; कोकण रेल्वे स्थानकांवरील सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

   Follow us on        

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या अवकाळी पावसाने आणि पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही झोडपले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसामुळे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील कोटयावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र आज झालेल्या घटनेमुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुशोभणीकरणाचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला असून यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे. मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. आजच्या पावसात या स्थानकावरील छताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्या.

रत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा निर्णय निवडणुकीनंतरच – रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना गुरुवारी हुबळी येथील रेल सौधा येथे आढावा बैठकीच्या अध्यक्षतेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणालेत .

यापूर्वी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात या प्रस्तावाला विरोध झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे कार्पोरेशन ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला मिळणार्‍या नफ्यातच विकासकामे करावी लागतात त्यामुळे त्यावर मर्यादा येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद केली जात नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अनेक लाभांपासून कोकण रेल्वेमार्ग वंचित राहिला आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी आता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांनी करण्यास सुरवात केली आहे. अलीकडेच कोकण रेल्वेच्या विलिनीकरणा संदर्भात मुंबई मध्ये अखंड कोकण रेल्वे सेवा समितीची पत्रकार परिषदे संपन्न झाली होती. या परिषदेत कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाच्या मागणीवर जोर देण्यात आला होता.

महत्वाचे: कोकण रेल्वेतील १९० पदांसाठी अर्ज स्विकारणीला मुदतवाढ; भरतीबद्द्ल असलेला मोठा गैरसमज दूर




KRCL Recruitment:
रेल्वेतील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपत होती तिला १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असून दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज स्वीकृती करण्यात येईल अशी माहिती कोकणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज दिली.
कोकण रेल्वेने विविध १९० पदांसाठी भरती जाहीर केली होती. ही भरती लोटे एमआयडीसी येथील रोलिंग स्टॉक कंपनी साठी आहे असा गैरसमज काही अर्जदारांमध्ये आहे. मात्र ही भरती रोलिंग स्टॉक कंपनीसाठी नसून कोकण रेल्वेसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि  एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य 
 या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि  कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
.
अधिक माहितीकरिता खालील जाहिरात वाचावी



सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म लांबीचे काम डिसेंबर अखेरपर्यंत लांबले; कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील क्रमांक ११ आणि १२ च्या प्लॅटफॉर्मच्या लांबीच्या विस्ताराचे काम अपूर्ण असून ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या  कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात येणार आहेत.  कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search