Konkan Railway: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार (ता. २५) पासून रोहा स्थानकात खालील एक्स्प्रेस थांबविण्यात येणार आहेत.
- गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही गाडी दिनांक २६ जानेवारीपासून (वेळ ०३.०० – ०३.०२)
- गाडी क्रमांक. १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ २०.३० -२०.३२)
- गाडी क्रमांक. २२६२९ दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ २३.१५ – २३.१७)
- गाडी क्रमांक. २२६३० तिरुनेलवेली – दादर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक.१२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून ( वेळ ०९.१५ – ०९.१७ )
- गाडी क्रमांक. १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ ०९.२० – ०९.२२)
- गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक. २०९३२ इंदूर – कोचुवेली एक्स्प्रेस एक्स्प्रेस २९ जानेवारीपासून ( वेळ १२.४५ – १२.४५ )
- गाडी क्रमांक. २२४७५ हिसार -कोइम्बतूर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १६.५० – १६.५२ )
- गाडी क्रमांक. २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्सप्रेस २६जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
या गाड्या रोहा स्थानकावर थांबणार आहेत.
विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पाहिल्या गाडीचे स्वागत होणार
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रोहा स्थानकावरील कोविड काळात काढून घेतलेले थांबे पूर्ववत करावेत यासाठी प्रयत्न केले होते. विद्यमान लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने हे थांबे पुन्हा मिळाले आहेत. या गाड्यांच्या थांब्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रोहा स्थानकावर आज गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस या गाडीच्या आगमनावेळी होणार आहे.
Facebook Comments Box