Block "Google News" not found
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे.यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या.
Read Also : मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस नेहमीच उशिरा – प्रवाशांचे हाल
मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तरीही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Read Also :कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….
Read Also : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…